23 December 2024 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मुंबईत जे काही बेकायदेशीर आलं आहे | ते शिवसेनेमुळे आलं

BJP MP Narayan Rane, CM Uddhav Thackeray, Marathi News ABP Maza, Kangana Ranaut

मुंबई, 9 सप्टेंबर: कंगना प्रकरणावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला केला आहे. कंगना काय बोलली वगैरे हा वेगळा मुद्दा असून नियमाने कारवाई करावी, असं ते म्हणाले. कंगना मुंबईत आली, तिच्या घरी गेली सुद्धा, शिवसेनेचं नाक कापलं, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

या मुंबईत जे काही बेकायदेशीर आलं आहे, हे शिवसेनेमुळे आलं आहे, अनेक बांधकामं ही बेकायदेशीर आहेत. ज्यांनी काल हक्कभंग आणला ते सरनाईक त्यांची ठाण्यात किती बांधकामे आहेत ते बघा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा 50 टक्के मराठी लोकसंख्या होती. आता एका मतदारसंघातून मराठी माणूस निवडून येईल अशी परिस्थिती नाही. मराठी माणूस कुठे आहे? या परिस्थितीला शिवसेना जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत खा. राणे बोलत होते. अधिवेशनाच्या कामकाजावर बोलताना राणे म्हणाले की, “करोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. करोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार कसे अपयशी ठरले आहे, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुद्देसूद भाषण केले. मात्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. दोन दिवसाच्या अधिवेशनात सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातल्याने अनेक विधेयके चर्चेविनाच मंजूर केली गेली. जर नियतीनं भविष्यात कधी अधिवेशन घेण्याची वेळ आलीच. तर पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्यावं, तास दोन तासांचं,” असा टोला राणे यांनी लगावला.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच न्यायालयाच्या निर्णयावर देखील खासदार नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे. पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करणार आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून ठरणार आहे. यावर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारने नात्या-गोत्यातले साधे वकील उभे केले. चांगला वकील सर्वोच्च न्यायालयात दिला नाही. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप राणे यांनी केला. तसेच ठाकरे सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाही, असेही राणे म्हणाले.

 

News English Summary: BJP leader Narayan Rane has strongly attacked Shiv Sena over Kangana case. What Kangana said is a different matter and action should be taken according to the rules, he said. Kangana came to Mumbai, even went to her house, cut off the nose of Shiv Sena, in such words they have targeted Shiv Sena.

News English Title: BJP MP Narayan Rane Attacks Maharashtra CM Uddhav Thackeray Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x