23 February 2025 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार
x

रेल्वेमंत्री रात्रभर उगाचच ट्विट करत होते, इथे रात्री ९ नंतर झोप महत्वाची - आ. भातखळकर

BJP MLA Atul Bhatkhalkar, CM Uddhav Thackeray

मुंबई, २५ मे : स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून आता केंद्र आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आज दुपारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालय महाराष्ट्राची तयारी असूनही कमी रेल्वेगाड्या सोडत असल्याची तक्रार केली होती. उद्धव ठाकरे यांचा हा आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे पियूष गोयल यांनी आज संध्याकाळी ट्विट करुन रेल्वे मंत्रालय सोमवारी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवायला तयार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी तासाभरात महाराष्ट्र सरकारने रेल्वे प्रबंधकांकडे मजुरांची यादी व इतर तपशील पाठवावा, असे गोयल यांनी सांगितले होते.

मात्र, राज्य सरकारने यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या ट्विटमध्ये गोयल यांनी म्हटले आहे की, दीड तास उलटून गेला तरी महाराष्ट्र सरकारने उद्या सोडण्यात येणाऱ्या १२५ श्रमिक ट्रेनसाठी आवश्यक तपशील पुरवलेला नाही. ही माहिती मिळाल्यानंतर या ट्रेन्सचे नियोजन करायला वेळ जातो. आम्हाला गेल्यावेळप्रमाणे महाराष्ट्रातून रिकाम्या रेल्वे परत आणायच्या नाहीत. त्यामुळे नियोजन न करता या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य नाही, असेही गोयल यांनी म्हटले आहे.

यावरून राज्यातील भाजप नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष केलं आहे. भाजपचे मुंबईतील आमदार अतुल भातखळकर यांनी याच विषयाचा धागा पकडून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “रेल्वे मंत्री पियुष गोयल रात्रभर उगाचच ट्विट करत होते, उत्तराची वाट पहात होते…तिथे रात्री ९ नंतर ट्विट बघतेय कोण? झोप वैगेरे काही प्रकार आहे की नाही?

या टीकेमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोना आपत्तीत लोकांचा जीव जातं असताना हा संघर्ष पाहून सामान्य लोकांमध्ये देखील चिढ वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: BJP’s Mumbai MLA Atul Bhatkhalkar has taken up the issue and castigated the state government. MLA Atul Bhatkhalkar while tweeting said, “Railway Minister Piyush Goyal was tweeting all night long, waiting for reply … Who is watching the tweet after 9 pm? Is there any other type of sleep or not?

News English Title: BJP Mumbai MLA Atul Bhatkhalkar slams State Government over Railway and Migrants issue News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x