मुंबई महापालिका निवडणूक | भाजपचं थेट दिल्लीहून मुंबईवर लक्ष - चंद्रकांत पाटील
मुंबई, ०१ जानेवारी : राज्यातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेबाबत भारतीय जनता पक्ष अत्यंत सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेची सत्ता जाऊन भाजपचा महापौर बसणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. मुंबईतील गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारच भाजपचा प्रमुख मतदार असेल असं म्हटलं जातंय.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत संपूर्ण देशातील भारतीय जनता पक्षाचे नेते उतरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या देखील सभा आयोजित केल्या जातील असं खात्रीलायक वृत्त भाजपच्या गोटातून आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यातून त्याला दुजोरा मिळत आहे.
राज्यातील अन्य निवडणुकांप्रमाणेच, मुंबई महापालिका हे भारतीय जनता पक्षाचं नव्या वर्षातलं लक्ष्य आहे. यावेळी थेट दिल्लीहून मुंबईवर लक्ष दिलं जाईल,’ असं सांगत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपची पुढची रणनीती उघड केली.
मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल बोलताना पाटील यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘मुंबई महापालिका ही काही जणांची जहागीर झाली आहे. अनेक राज्यकर्त्यांनी त्या-त्या वेळेला मुंबई यांना राहू दे, असं म्हणून महापालिकेकडं दुर्लक्ष केलं. मग मुंबई महापालिकेच्या सत्तेतून पैसा मिळवून राजकारण करत करत हे मजबूत झाले. या सगळ्यामध्ये मुंबईकरांच्या समस्या बाजूलाच राहिल्या आणि यांचं राजकारण मजबूत होत गेलं. मात्र, ही मजबुती सुद्धा आता टिकणार नाही. राज्यातलं एक वर्षाचं हे अत्यंत अनैसर्गिक सरकार ही मजबुती घालवून बसणार आहे,’ असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
News English Summary: Like other elections in the state, Mumbai Municipal Corporation is the BJP’s New Year target. This time, the focus will be on Mumbai directly from Delhi, ‘said Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil on the first day of the new year.
News English Title: BJP party plan for upcoming Mumbai municipal corporation election news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS