23 January 2025 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

कोविड सेंटरच्या नावाखाली मुंबई महापालिकेच्या वर्क ऑर्डरमध्ये ६ कोटींचा घोटाळा, भाजपचा आरोप

BJP President Chandrakant Patil, Corruption Allegations, BMC Work Order

मुंबई, २८ जून : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून मुंबई पुण्यासारख्या शहरांत रुग्णांची वाढ होत आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. मात्र, महापालिकेने काढलेल्या वर्क ऑर्डरमध्ये तब्बल ६ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “मुंबईत करोनानं प्रचंड थैमान घातलं आहे. मुंबईची परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर चालली आहे. एवढे मोठे संकट असताना मुंबईतील प्रशासन हे भ्रष्टाचार करण्यात मग्न आहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर करोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या तब्बल २३ वस्तूची ११ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर महापालिकेनं काढली असून, त्यात तब्बल ६ कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे.

कोविड सेंटरचं काम कंपन्यांच्या सीएसआर फंडातून होणार असल्याचं महापालिकेनं सुरूवातीला सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात महापालिकेनं त्यासाठी ११ कोटी रूपयांची वर्क ऑर्डर दिली असल्याचं उघडकीस आलं आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या वस्तू या ३ महिने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. मात्र त्यासाठी मोजलेली रक्कम ही त्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंमतीपेक्षा जास्त असल्याचे उघडकीस आले.”

२ हजार उभे फॅन हे १ कोटी ८० लाख रुपयांनी भाड्यानं घेतले मात्र, त्याची बाजारातील किंमत ही ७० लाख रुपये एवढी आहे. ८० सीसीटीव्ही हे ५७ लाख ६० हजार रुपयांनी भाड्याने घेतले, मात्र याची बाजारातील किंमत ही ८ लाख रूपये एवढी आहे. एकीकडे रुग्णसंख्या आटोक्यात येत नसताना, रोज कित्येक निष्पाप लोकांचे प्राण जात असताना मुंबई महानगरपालिका प्रशासन मात्र जनतेचे पैसे लुबाडण्यात मग्न आहे. एक माणूस म्हणून एवढ्या खालच्या पातळीला कसे कोण जाऊ शकते? सत्ताधारी यावर तरी कारवाई करणार का? प्रशासनाच्या कारभारात जे चालू आहे ते खरंच खूप धक्कादायक आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: BJP state president Chandrakant Patil has alleged that a scam of Rs 6 crore was committed in the work order issued by the municipal corporation.

News English Title: BJP President Chandrakant Patil Corruption Allegations Against Bmc Six Crore Fraud In Bmc Work Order News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x