भाजप नेते एका सीरिजने आरोप करत आहेत? | त्या आरोपानंतर रिपब्लिकसाठी संलग्न ट्विट
मुंबई, १५ मार्च: सध्या सचिन वझे यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये काही गोष्टी ताळमेळ ठेवून आणि नियोजनबद्ध पद्धतीने होताना दिसत आहेत. १०५ आमदारांपैकी केवळ ठरविक नेते एकमेकांशी संवाद करून ते करत नाहीत ना अशी शंका उपस्थित होऊ शकते.
वास्तविक हसमुख हिरेन आणि TRP घोटाळा ही दोन भिन्न प्रकरणं आहेत. त्यातील TRP घोटाळा प्रकरण पुराव्यानिशी न्यायालयात असून त्यावर दोन्ही बाजूने मोठे आणि अनुभवी वकील नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्या व्हाट्सअँप चाट लिकनंतर भाजपाची देखील बदनामी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र त्यामुळे भाजपचे नेते कोणतीही प्रतिक्रिया किंवा भाष्य करण्यास पुढे आले नव्हते. मात्र आता काही गोष्टी शिस्तबद्ध पुढे सरकविण्यास सुरुवात झाली आहे का अशी शंका उपस्थित होऊ शकते. कारण, भाजपाची तीच काम करण्याची पद्धत २०१४ पासून अवलंबण्यात आल्याचं मागील उदाहरणं सांगतील.
म्हणजे आमदार नितेश राणे यांनी २:३० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात त्यांनी IPL सट्टेबाजांकडून खंडणी मागितल्याचा सचिन वाझे यांच्यावर आरोप करताना त्यामध्ये वरुण सरदेसाई यांचं देखील नाव घेतलं आहे. ही पत्रकार परिषद संपते तोच एका तासाने म्हणजे ३:३७ वाजता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी कोणाचही नाव न घेता आणि “खंडणी आणि वसुली” याच शब्दांवर जोर देत एक ट्विट केलं आहे.
पत्रकार परिषद
Livehttps://t.co/qs6n9ZP1Gp— nitesh rane (@NiteshNRane) March 15, 2021
या “एन्काऊंटर स्पेशल” अधिकाऱ्यांने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच
खंडणी वसूल केली होती का?
त्याही प्रकरणात मिडिया हाऊसकडून वसूली केली होती का?
कुणाच्या जोरावर मिडिया हाऊसकडून वसूलीचे बळ आले?
कोण आहेत पडद्यामागचे सुत्रधार?
सत्य समोर यायला हवे!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 15, 2021
त्यात त्यांनी म्हटलं आहे, ‘या “एन्काऊंटर स्पेशल” अधिकाऱ्यांने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच….खंडणी वसूल केली होती का?…त्याही प्रकरणात मिडिया हाऊसकडून वसूली केली होती का? ….कुणाच्या जोरावर मिडिया हाऊसकडून वसूलीचे बळ आले?….कोण आहेत पडद्यामागचे सुत्रधार…. सत्य समोर यायला हवे!
आता टीआरपी घोटाळा हा थेट रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्या संबंधित आहे. यापूर्वी मीडिया हाऊसकडून खंडणीची कोणतीही बातमी याच विषयाला अनुसरून पुढे आल्याची माहिती नाही. मग आशिष शेलार यांना अशी माहीत कोणी दिली किंवा अशी पुडी सोडण्यासाठी त्यांच्या सोबत मीडियातील कोणी संपर्कात आहेत का असा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण उद्या असेच मुद्दे संबधित खटल्यास उदाहरण किंवा माहिती म्हणून दिले जातात आणि खटला कमजोर केला जातो. पार्थो दासगुप्ता यांच्या व्हाट्सअँप चाट लिकनंतर रिपब्लिक पासून स्वतःला लांब ठेवणारे भाजप नेते पुन्हा अप्रत्यक्ष पुड्या सोडण्यास सरसावल्याचं पाहायला मिळत आहे. पण त्यात दिसत आहेत ते अचूक टायमिंग आणि नियोजनबद्धता असंच म्हणावं लागेल. सध्या तरी म्हणजे जानेवारी २०२१ मधील मुंबई हायकोर्टातील सुनावणीत मुंबई पोलीस १५ जानेवारी २०२१ पर्यंत रिपब्लिकविरुद्ध कोणतीही धडक कारवाई करणार नाही असं वकिलामार्फत म्हटलं होतं. आता ती तारीख देखील उलटून गेल्याने भाजप नेत्यांचं जुनं प्रेम उफाळून आल्याचं म्हणता येईल.
#BombayHighCourt records Sr Adv Kapil Sibal’s statement to continue his previous statement that the Mumbai Police will not take coercive steps against any employee of Republic TV till January 15, 2021.@KapilSibal @MumbaiPolice @republic https://t.co/AVsXYQorBG
— Bar & Bench (@barandbench) January 6, 2021
News English Summary: Currently, after the arrest of Sachin Vaze, the BJP leader is seen to be aggressive. But some things seem to be happening in a coordinated and planned manner. Out of 105 MLAs, it is doubtful whether only certain leaders communicate with each other and do so.
News English Title: BJP social media and offline strategy after arrest of API Sachin Vaze news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS