21 November 2024 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भाजपा प्रवक्त्या श्वेता शालिनी यांची खुल्या पत्राद्वारे सेनेवर अप्रत्यक्ष टीका

BJP spokesperson Shweta Shalini, Sonu Sood, Shivsena, Sanjay Raut

मुंबई, ८ जून: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या ‘मातोश्री’भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्याला जोरदार टोला लगावला. ‘अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला…मातोश्रीवर पोहोचले’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

सोनू सूद हा लॉकडाऊन काळात परप्रांतीय मजुरांना आपापल्या गावी सोडण्याची सोय करतोय. त्याच्या या कार्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ‘लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते?’, असा सवाल सामनाच्या रोखठोकमधून करण्यात आला. यावरून काल दिवसभर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर अखेर रात्री पावणे दहाच्या सुमारास सोनू सूदने काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास त्यांच्यात चर्चा झाली.

दरम्यान, विरोधकांकडून आता शिवसेनेला लक्ष होऊ लागले. भाजपा प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी सोनू सूदला खुलं पत्र लिहित माफी मागितली आहे. ‘आम्हा राजकारण्यांमध्ये आता माणुसकी उरली नाही’, असं म्हणत सोनू सूदच्या कामगिरीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे पत्र?

‘मला माफ कर कारण मीसुद्धा या राजकीय व्यवस्थेचा एक भाग आहे. ही व्यवस्था प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करते. चांगल्या गोष्टीतही वाईट बघण्याची ही वृत्ती आहे. मला आठवतंय, स्थलांतरितांच्या वेदनांबद्दल तू बोलत होतास. भुकेल्या मुलाला कडेकर उचलून मैलोनमैल चालणाऱ्या माऊलीला पाहून तुझे डोळे पाणवले होते. मला माफ कर, आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरली नाही. आम्ही लोकांमध्ये त्यांचा जीव पाहत नाही, तर मतदार म्हणून त्यांचा आकडा मोजतो. आम्हाला लोकांच्या संवेदनशीलतेचा राग येतो, कारण आमच्यातील संवेदनशीलतेला आम्ही खूप आधीच मारून टाकलंय. स्थलांतरित मजुरांचा रंग, धर्म, जात न बघता तू त्यांची मदत केलीस. हे आम्ही एकवेळ विसरू पण तू कोणाची भेट घेतलीस हे विसरणार नाही. राज्यपाल तुला काय म्हणाले, हे ‘सामना’ला माहित आहे, पण या स्थलांतरितांकडून तुला आलेल्या हजारों मेसेजवर पडदा टाकतील.

एक व्यक्ती बदल घडवून आणू शकतो हे तू सिद्ध केलंस आणि ते बदल घडवण्यासाठी त्या व्यक्तीला मुख्यमंत्री असण्याची गरज नाही. तुझ्यासारखे लोक देशाला प्राधान्य देतात. तू खरा हिरो आहेस.’

 

News English Summary: Shiv Sena is now getting attention from the opposition. BJP spokesperson Shweta Shalini has written an open letter to Sonu Sood apologizing. Sonu Sood has lashed out at those who are trying to give a political color to her performance, saying, “We have no humanity left in politicians.”

News English Title: BJP spokesperson Shweta Shalini has written an open letter to Sonu Sood apologizing News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x