22 January 2025 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण मनसे स्वीकारणार नाहीत | त्यांनी धोरण बदलायला हवं तर...

BJP State President Chandrakant Patil, Alliance, MNS party, Raj Thackeray

मुंबई, २३ नोव्हेंबर: महाविकास आघाडीची स्थापना करून शिवसेनेच्या पदरात मुख्यमंत्रीपद पडलं आणि भारतीय जनता पक्षाचा राजकीय गेम केल्यानंतर भाजपचे नेते शहरी भागातील मराठी मतांवरून चिंतेत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत अमराठी मतच भाजपच्या केंद्रस्थानी असतील असं राजकीय विश्लेषक मत मांडत आहेत. पण मराठी मतदार हा शिवसेनेचा बेस असल्याने भाजपाला मराठी मतांसाठी दुसरा साथीदार हवा आहे. त्यामुळे मनसे संबंधित निवडणूक पूर्व पुड्या सोडण्यास भाजपकडून सुरुवात झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना प्रत्युत्तर दिलं. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारं विधान केलं. यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवर तळमळीनं रिऍक्ट होतात. पण आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण ते स्वीकारणार नाहीत. त्यांनी त्यांचं धोरण बदलायला हवं. त्यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय मनसेशी युती होऊ शकत नाही, असं पाटील म्हणाले. मराठी माणसाला नोकऱ्या मिळायलाच हव्यात. त्याबदल दुमत नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: In a press conference held by Chandrakant Patil yesterday, he was asked about the alliance with MNS. Raj Thackeray reacts angrily to the questions of the people. But they will not accept our foreign policy. They need to change their policy. He said that there could be no alliance with MNS unless he changed his stance on foreigners. Marathi man must get jobs. He also clarified that there is no change in that.

News English Title: BJP State President Chandrakant Patil clears party stand about MNS party news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x