23 January 2025 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH Airtel New Plans | एअरटेलचे 2 नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च, मिळतील अनलिमिटेड बेनिफिट्स, एकदा किंमत पाहून घ्या Credit Card | केवळ बिल पेमेंट करून सिबिल स्कोर सुधारणार नाही, या पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरण्यास सुरुवात करा SBI Mutual Fund | कमालच करतेय 'ही' SBI म्युच्युअल फंड योजना, मिळेल 4 पटीने परतावा, सेव्ह करून ठेवा ही योजना Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स
x

भाजपच्या आयात आणि निष्ठावंतांमध्ये तणाव वाढण्यापूर्वीच चंद्रकांत पाटलांचा यु-टर्न

BJP President Chandrakant Patil, Devendra Fadnavis, Girish Mahajan

मुंबई: मेगाभरतीमुळं भाजपची संस्कृती बिघडली असं विधान करणारे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी घूमजाव केलं आहे. लोकसभा आणि विधानसभेपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेल्या नेत्यांमुळं भारतीय जनता पक्षाला फायदाच झाला असं स्पष्टीकरण आज चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पिंपरीतल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरतीसंदर्भात खंत व्यक्त करणारे सूर आळवले होते. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर भाजपच्या आयात आणि निष्ठावंतांमध्ये तणाव वाढण्यापूर्वीच चंद्रकांत पाटलांचा पत्रकार परिषद घेऊन यु-टर्न घेतल्याचं म्हटलं जातं आहे. त्यांच्या विधानाने फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या एकाधिकारशाहीकडे देखील अनेकांनी बोटं दाखवलं.

विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावं लागल्याचं मोठं दुःख आहे. त्यात भारतीय जनता पक्षातील जुन्या जाणत्या अनेक निष्ठावंतांना पक्षात तिकीटं मिळाली नाही याचा देखील प्रचंड राग आहे. त्यामुळे खुद्द महाराष्ट्र पक्षाध्यक्षांनीच निवडणूकपूर्व मेगाभरतीला वाचा फोडल्याने भारतीय जनता पक्षातील हा सुप्त असंतोष कदाचित मोठ्या प्रमाणावर वाढीस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान मेगाभरतीसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोचक टीका केली होती. या राजकीय धक्क्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर भारतीय जनता पक्षाला देवो अशा शब्दात त्यांनी सणसणीत टोला हाणला आहे.

फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन या सगळ्या मेगाभरतीचे सूत्रधार होते. पण निकालानंतर जे चित्र पुढे आलं त्यामुळे ही मेगाभरती भाजपला फायद्याची ठरली नाही हे सिद्ध झालंय. याची कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. त्यांच्या या विधानामुळे भाजपमध्येही त्याबाबतीत असंतोष आहे हे स्पष्ट झालंय. पिंपरी-चिंचवड इथं झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो. पण थोडा बदल झाला. जो काम करतो त्याला नाही तर तो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेलीत. हे कल्चर आता उद्धवस्त करावं लागणार आहे.

सरकार स्थापनेच्या सुरुवातीलाच बहुमताचा आकडा गाठणं अशक्य असल्याचं लक्षात येताच भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं जाहीर केलं. मात्र, मागील काही दिवसांपासून असमर्थ ठरणारे भाजपचे नेते अचानक पुन्हा आमचंच सरकार येणार असं वारंवार बोलू लागले आहेत. परंतु, त्यामागील मुख्य कारण दुसरंच असल्याचं वृत्त आहे. कारण महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होताच भारतीय जनता पक्षातील विद्यमान नेते मंडळी भाजपाला सोडचिट्ठी देण्याचा मार्गावर असल्याची चुणचुण भाजपाला लागली आहे.

अगदी सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास भाजपाला रामराम ठोकून काँग्रेस-राष्ट्र्वादीत फेर-मेगाभरती होणार असल्याचं वृत्त आहे. त्यात भाजपमध्ये गेलेले काँग्रेस-राष्ट्र्वादीतील मोठे नेते सामील असून, त्यात सर्वाधिक नेते विधानसभेत आमदार होऊन निवडून आले आहेत. अगदीच उदाहरण द्यायचे झाल्यास, काँग्रेसचे नगरमधील माजी नेते तसेच माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा देखील समावेश असल्याचं वृत्त आहे. भाजपमध्ये देखील त्यांनी विशेष कामगिरी न केल्याने त्यांचं भाजपातील वजन घटलं असून, भाजपाची सत्ता गेल्याने विरोधी पक्ष नेते पद देखील फडणवीसांना गेलं आणि विखे पाटील ५ वर्ष विधानसभेत केवळ आमदार म्हणून राहतील जे त्यांना राजकीय दृष्ट्या धोक्याचं आहे.

भाजपमध्ये आयत्यावेळी प्रवेश केलेल्या नेत्यांची निकालानंतरच्या घडामोडींमुळे मोठी राजकीय कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना २०२४च्या अनुषंगाने मतदारसंघात स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवायचे असल्यास राज्यात सत्तेत येणाऱ्या राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा शिवसेनेच्या आश्रयाला जावे लागेल अशी राजकीय अडचण निर्माण झाली आहे.

पंचायत समितीत देखील महाविकास आघाडीने भाजपाला धक्के दिल्याने स्थानिक पातळीवर स्वतःच राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी सत्ताधारी पक्षांमध्ये जाणं सोयीचं समजत आहेत. भाजपातील किमान १७ विद्यमान आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे कमित कमी पक्षातील निष्ठावंत तरी कसे जपता येतील यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे वक्तव्य केल्याचं म्हटलं जातं आहे. तसेच आयतांना पक्षात प्राधान्य देऊन मेगा भरती करणाऱ्या फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या विरुद्ध भाजपातील निष्ठावंतांचा रोष वाढू नये याची काळजी घेण्यास राज्य भाजप सरसावल्याचं म्हटलं जातं आहे आणि त्यामुळे भाजपात लवकरच नेत्यांचे महविकास आघाडीत प्रवेश करणं सुरु होणार असल्याचं वृत्त आहे.

 

Web Title:  BJP State President Chandrakant Patil on BJP Maharashtra incoming issue.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x