5 November 2024 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER
x

फडणवीस 'पुन्हा येणार नाहीत'; भाजपच्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा

BJP, Shivsena

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले असून हे आमंत्रण फडणवीस स्वीकारणार का? बहुमताच्या अग्निपरीक्षेला ते सामोरे जाणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार होते.

दरम्यान, मार्ग निघत नसल्यानं अखेर पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे कोअर कमिटीच्या नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून राजकीय गोंधळ सुरू असताना अमित शाह यांचं नाव फारस पुढे आलं नव्हत. आता आज पहिल्यांदाच अमित शाह यांनी सत्तेचा पेच सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचं समजलं.

मात्र राजभवनाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हटलं की, जनतेने जनादेश भाजप आणि शिवसेनेच्या युतीला दिला होता. मात्र शिवसेनेने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असं म्हटलं आहे. मात्र ही देताना भाजपच्या सर्व नेत्यांचे चेहरे रडकुंडीला आल्याचे स्पष्ट दिसत होते, तर काहींनी जबरदस्ती चेहऱ्यावर स्मित हास्य दाखवत होते. त्यामुळे भाजपने विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय घेतल्याचं आता स्पष्ट झाला आहे.

दुसरीकडे काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांना जयपूरला हलविले आहे. तेथे राज्यातील नेते कालच पोहोचले असून आमदारांशी चर्चा केली आहे. या बैठकीनंतर प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असल्याचे सांगितले. मात्र, काँग्रेसच्या नेत्याना सोनिया गांधी याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग3ेस राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल मिळाल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x