5 November 2024 8:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

कोरोना आपत्तीत मुंबईतील ९९% ICU बेड्स व्यापलेले; आता पुढे काय?

BMC, Mumbai, Covid 19 ICU Beds

मुंबई, २९ मे : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत केवळ रुग्णांच्या वाढीचं नाही तर रुग्णालयाचंही मोठं संकट आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी, त्यांची सोय करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडे विशेष सोय नसल्याचं दिसत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत शहरातील ९९% अतिदक्षता विभागातील बेड (ICU Beds) आणि ७२% व्हेंटिलेटर व्यापलेले आहेत. जी रुग्णालयं कोव्हिड-१९च्या गंभीर रुग्णांवर उपचार करत आहेत ती देखील ९६ टक्के भरले आहेत.

मुंबईत आता ३५ हजारांहून जास्त कोरोना रुग्ण आढळून आले असून आगामी पंधरा दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढण्याची भीती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी कोरोना रुग्ण संपर्क साखळी तोडण्याचं आव्हान स्वीकारले आहे. आयुक्तांनी स्वीकारलेले हे आव्हान म्हणजे अभिमन्यूने चक्रव्युहात शिकण्यासारखे असल्याचे पालिका अधिकारी व डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मागील २४ तासांत देशात १७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४७०६ जणांचा करोनानं बळी घेतला आहे. मृत्यूंच्या बाबतीत भाराताने चीनलाही मागे टाकले आहे. भारतामध्ये एकूण करोनाग्रस्तांची संख्या एक लाख ६५ हजार सातशे ९९ झाली आहे. यापैकी ८९ हजार ९८७ जणांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशातील ७१ हजार १०५ जणांनी करोनावर मात केली आहे.

 

News English Summary: Mumbai, the financial capital of the country, is facing a crisis not only of patient growth but also of hospitals. Although the number of corona patients is increasing, the Mumbai Municipal Corporation does not seem to have special facilities to accommodate them. So far, 99% of the city’s intensive care units (ICU beds) and 72% of ventilators are occupied, according to municipal figures. The hospitals that are treating critically ill patients of Covid-19 are also 96 per cent full.

News English Title: BMC Commissioner Iqbal Singh Chahal Accept This Challenge Regarding Corona Patients News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x