18 November 2024 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय? - आ. आशिष शेलार

BMC corporators, funding, BJP MLA Ashish Shelar, Shivsena

मुंबई, २७ फेब्रुवारी: महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सेनेचं नाक कापण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनाही प्रशासकीय डावपेच खेळून भारतीय जनता पक्षाची कोंडी करताना दिसत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता जेमतेम वर्षभराचा अवधी उरला आहे. अशावेळी नगरसेवकांकडून पाच वर्षातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपापल्या प्रभागात नवे प्रकल्प हाती घेतले जातात. साहजिकच त्यासाठी निधीची गरज लागते. मात्र, शिवसेनेने निधीवाटपात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची चांगलीच कोंडी केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनीही विकास निधी वाटपावरून सवाल उपस्थित करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “६५० कोटी विकास निधीपैकी शिवसेनेच्या ९७ नगरसेवकांना २३० कोटी, भारतीय जनता पक्षाच्या ८३ नगरसेवकांना ६० कोटी, काँग्रेसच्या २९ नगरसेवकांना ८१ कोटी आणि हो स्थायी समिती अध्यक्षांना एकट्याला ३० कोटी… मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय? हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या!,” अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेला सुनावलं आहे.

 

News English Summary: The Mumbai Municipal Corporation elections are now a year away. In such cases, new projects are undertaken by the corporators in their respective wards to fill the five-year backlog. Naturally, this requires funding. However, the Shiv Sena has done a good job of allocating funds to the BJP corporators. Bharatiya Janata Party MLA Ashish Shelar has also targeted the Shiv Sena, questioning the allocation of development funds.

News English Title: BMC corporators funding BJP MLA Ashish Shelar angry on Shivsena news updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x