23 February 2025 1:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

अखेर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या हाती शिवबंधन

Bollywood actress Urmila Matondkar, joined Shivsena, CM Uddhav Thackeray, Aaditya Thackeray

मुंबई, १ डिसेंबर: राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment minister Aditya Thackeray), राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Shivsena Rajysabha MP Priyanka Chaturvedi), महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.

पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचं उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar Press conference) यांनी सांगितलं आहे. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेनं उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर उर्मिला यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी कालच या चर्चेला दुजोरा दिला होता. त्यानुसार आज दुपारी उर्मिला मुख्यमंंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचल्या. तिथं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर या आज संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. तुम्ही सर्वजण देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार. मी मंगळवारी संध्याकाळी चार वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. कृपया कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहा, जय महाराष्ट्र, असे आवाहन उर्मिला मातोंडकर यांनी काल केले होते.

 

News English Summary: Shiv Sena candidate for the Legislative Council and eminent actress Urmila Matondkar officially joined the Shiv Sena on ‘Matoshree’ from the quota of MLAs appointed by the Governor. In the presence of Shiv Sena Chief and Chief Minister Uddhav Thackeray, Environment Minister Aditya Thackeray, Rajya Sabha MP Priyanka Chaturvedi, Mayor Kishori Pednekar, Mrs. Chief Minister Rashmi Thackeray Shivbandhan was tied in the hands of Urmila.

News English Title: Bollywood actress Urmila Matondkar joined Shivsena presence CM Uddhav Thackeray News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x