23 November 2024 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

विधानपरिषद | उर्मिलाचं संवाद कौशल्य फलदायी ठरणार | शिवसेनेच्या संपर्कात

Bollywood actress Urmila Matondkar, Join Shivsena, MLC Election

मुंबई, ३० ऑक्टोबर: राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उर्मिला मातोंडकरमध्ये उत्तम संवाद कौशल्य असून ती माध्यमांना देखील सुज्ञ प्रकारे तोंड देण्यास सक्षम असल्याचं सर्वानी पाहिलं होतं. त्यामुळे राज्यसभेला प्रियांका चतुर्वेदींनंतर आता विधानपरिषदेच्या तोंडावर उर्मिलाच्या नावाची चर्चा रंगली आहे आणि त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे.

विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

“यासंदर्भात मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रीमंडळाचा असतो. मंत्रीमंडळात निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात मंत्रीमंडळाने अधिकार दिले आहेत” असं राऊत म्हणाले.

राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र राज्यपालांना पाठविण्यात येणाऱ्या यादीत नेमकी नावे कोणाची आहेत, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या १२ जागांचे समान वाटप करण्यात आले आहे. तीनही पक्षांत विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची गर्दी होती. त्यातून दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार नावे निश्चित केल्याचे समजते. शिवसेनेचीही चार नावे निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे.

 

News English Summary: Bollywood ace actress and former Congress leader Urmila Matondkar is all set to start a new inning with Maharashtra’s ruling party Shiv Sena. Going by the reports of media, she will get a Legislative Council ticket from Shiv Sena quota. If sources are to be believed, Urmila Matondkar can be made MLC on the Shiv Sena ticket from the quota appointed by the governor. If reports are to be true, Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray himself has spoken to Urmila Matondkar on phone. In the Lok Sabha elections, Urmila Matondkar has contested the election of MP from North Mumbai on a Congress ticket. Recently, Urmila Matondkar took on Kangana in a fight between Kangana Ranaut and the Maharashtra government.

News English Title: Bollywood actress Urmila Matondkar may join Shivsena news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x