16 April 2025 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

बाळासाहेबांना वंदन केल्याशिवाय कुठलीही शपथ वा कामकाज आम्ही करत नाही: एकनाथ शिंदे

Minister Eknath Shinde, Chief Minister Uddhav Thackeray, Shivsena, Balasaheb Thackeray

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत आहेत. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

एक हंगामी अध्यक्ष हटवून दुसरे अध्यक्ष बदलल्याची घटना देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती. त्यामुळे सरकारला अध्यक्ष का बदलावा लागला. संविधानाची पायमल्ली होत आहे. हंगामी अध्यक्ष झाल्यानंतर आजवर विश्वासमताचा प्रस्ताव आला नाही. तुम्हाला कसली भीती होती. गुप्त मतदान पद्धतीने मतदान झालं तर आपला विश्वास दर्शक ठराव मंजूर होणार नाही. याची भीती तुम्हाला होती. त्यामुळेच सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले असं फडणवीस म्हणाले. एकूणच शपथ विधीसोहळ्यात उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्वतःच्या नेत्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत या थोर महापुरुषांना देखील वंदन केलं होतं. त्यामुळे साहजिकच स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधीसहित सर्वच म्हणजे एकूण मूळ शपथविधील इतर महापुरुषांच्या उल्लेखाला देखील न बोलताच विरोध दर्शवला अशी चर्चा रंगली आणि त्याची चर्चा देखोल विधानसभेत रंगली ज्यावर स्वतः मुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांनी देखील भाष्य केलं.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा शपथवीधीदरम्यान जर उल्लेख झाला तर भाजपाला राग का यावा. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाजपाला असूया आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला.

तसेच भाजपच्या आक्षेपाला मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिउत्तर दिलं आहे. शिवतीर्थावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आदरणीय बाळासाहेबांच्या स्मारकासमोर, लाखो महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर या सरकारचा शपथविधी झालेला आहे. राज्यपालांनी शपथ घेण्यावर आक्षेप घेतला. काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले सगळेच आणि मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून शपथ घेतली आहे. बाळासाहेबांना वंदन केल्याशिवाय कुठलीही शपथ किंबहुना कुठलं कामकाज आम्ही करत नाही.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये जोरदार हंगामा झाल्याचं पहायला मिळालं. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून दादागिरी नही चलेगी अशी घोषणाबाजी केली. तसंच यावेळी मंत्र्यांचा परिचय सुद्धा योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरही आक्षेप घेतला. देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष कधीही निवडण्यात आले नाही. हंगामी अध्यक्ष बदलण्याची गरज काय पडली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केली. नियम, कामकाज धाब्यावर बसवून विधीमंडळाचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

महत्वाची सूचना: आता तुम्ही सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज’वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास.

https://www.maharashtranama.com/online-test/

 

NOTE: You can practice online here for Sarkari Naukri online. The exams you can prepare are MPSC Test, Talathi Pariksha, Police Bharti Pariksha, Railway Police Bharti Pariksha, Mahavitaran Bharti Pariksha, Arogya Vibhag Bharti, Vanrakshak Bharti Pariksha, Bank Online Pariksha, Krushi Vibhag Bharti, Pashusanwardhan Vibhag pariksha, Maharashtra Court Bharti Pariksha, mahapariksha, Unacademy, IBPS, Bank Officer Exam Study, UPSC Test, BMC Bharti, Railway Bharti, Railway Recruitment

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EknathShinde(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या