23 January 2025 6:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

लॉकडाउनबद्दल लोकांचा कौल राज ठाकरेंच्या बाजूने | ऑनलाइन सर्वेक्षणाचा रिझल्ट

Lockdown, MNS Survey, Sandeep Deshpande

मुंबई, २५ ऑगस्ट : ‘लॉकडाऊन हवं की नको?’ याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरु केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी साडे पाच महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनबाबत जनतेची काय मत आहेत हे जाणून घेण्यासाठी मनसेनं सहा दिवसांचे सर्वेक्षण सुरु केलं होतं. आज मनसे नेते संदिप देशपांडे यांनी या सर्वेक्षणाचा कौल जाहीर केला आहे.

‘लॉकडाऊन हवं की नको?’ याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरु केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी साडे पाच महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनबाबत जनतेची काय मत आहेत हे जाणून घेण्यासाठी मनसेनं सहा दिवसांचे सर्वेक्षण सुरु केलं होतं. आज मनसे नेते संदिप देशपांडे यांनी या सर्वेक्षणाचा कौल जाहीर केला आहे.

राज्यातील जनतेला लॉकडाऊन बाबत काय वाटत. तसंच, लॉकडाऊन हवं की नको? यावर तुमचं मत मांडा असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं होतं. मनसेचे सरचिटणीस यांनी त्यांच्या ट्विटरवर हे सर्वेक्षण सुरु केलं होतं. यात ७०. ०३ टक्के लोकांनी लॉकडाऊनविरोधात मत नोंदवली आहे. तर, २६ टक्के लोकांनी लॉकडाऊनचे समर्थन केलं आहे.

तर लॉकडाउनच्या काळात नोकऱ्या आणि उद्योगधंद्यांसाठी सरकारकडून योग्य मदत मिळाली नसल्याचं 84.9 टक्के जणांनी सांगितलं आहे. तर राज्य सरकारने शिक्षणाबद्दल घेतलेला निर्णय योग्य नसल्याचं 52.4 टक्के जणांनी म्हटलं आहे.

शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत नसल्याचं 74.3 टक्के जणांनी आपलं मत नोंदवलं आहे. तर मुंबईकरांच्या दृष्टीने जिव्हाळ्याची असलेली लोकलसेवा पूर्ववत व्हावी असं 73.5 टक्के जणांनी म्हटले आहे.

लॉकडाउनच्या काळात मदत वेळेत आणि योग्य मिळाली नसल्याचं 60.2 टक्के जणांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर या काळात वीज बिलांबद्दल समाधानी नसल्याचं तब्बल 90.2 टक्के जण म्हणाले आहेत. लॉकडाउनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी थांबूनच काम करत होते, याबद्दल 63.6 टक्के जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: The poll started by Maharashtra Navnirman Sena has been announced. A lockdown has been in place for five and a half months to stop the spread of the corona. However, the MNS had started a six-day survey to know the public’s opinion about the lockdown.

News English Title: Cancel the lockdown now 70 percent of the people vote in MNS lockdown survey News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SandeepDeshpande(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x