21 November 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मला पटतय, आपल्याला पटतय ना ? तिथीचा हट्ट सोडा - अमोल मिटकरी

CM Uddhav Thackeray, NCP Leader Amol Mitkari, Shiv Jayanti

मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी ही जाहीर करावी आणि तिथीचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी सोडावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. मला पटतय, आपल्याला पटतय ना..?, असं अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ट्विटसोबत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यावर तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजंयतीची तारीख जाहीर करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे.

शिवजयंतीच्या या तारखेवरुन शिवसेना आणि अन्य मराठा संघटनांमध्ये औरंगाबाद येथे मारहाणीचा प्रकारही घडला होता. शिवजयंती १९ फेब्रुवारीला तारखेनुसार साजरी केली जात असताना शिवसेना नेत्यांकडून तिथीचा घोळ घालून वेगळी जयंती साजरी करण्याचा घाट घातला जातो. हा शिवरायांचा अवमान आहे त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचं बंद करावं अशी मागणी आमदार नितेश राणेंनी केली होती.

शिवसेना दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते. भारतीय जनता पक्षासोबत युती असताना देखील शिवसेनेने वारंवार शिवजयंती तिथीनुसार साजरी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र यावेळी राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित सत्तेत आहे. तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं असल्याने एकमेकांच्या मागण्या तसंच भावनांचा आदर राखण्याचा तिन्ही पक्ष पुरेपूर प्रयत्न करत असून एनसीपीच्या या आवाहनाला शिवसेना काय प्रतिसाद देते हे पहावं लागणार आहे.

 

Web Title: Celebrate Shiv Jayanti February 19th NCP Leader Amol Mitkari appeals Chief Minister Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#NCP(372)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x