आधी गर्दीच्या विभाजनासाठी तंत्रज्ञानातून उपाय शोधा | राज्य सरकारला सल्ला
मुंबई, २९ ऑक्टोबर: सरसकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने पश्चिम रेल्वे,मध्य रेल्वेला पत्र पाठविले होते. या पत्राला रेल्वेकडून उत्तर आले आहे. २२ आणि २७ ऑक्टोंबरला राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीचा संदर्भ देऊन, रेल्वेने कार्यालयीन वेळा बदलण्या संदर्भात या पत्रात उल्लेख केला आहे. ज्यामुळे गर्दीच्या वेळी अडचण होणार नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. लोकल सुरू झाल्यावर गर्दीचे नियोजन कसे करणार ? अशी विचारणा या पत्राद्वारे रेल्वेने राज्य सरकारला केले आहे. शिवाय लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे यांची लवकर बैठक व्हावी. यामध्ये गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक दृष्ट्या मार्ग काढावा असे यात म्हटले आहे.
राज्य सरकारने पाठवलेल्या पत्रात प्रत्येक तासाला महिला स्पेशल गाडी चालवावी असे म्हटले आहे. पण ते तूर्तास शक्य नाही असे रेल्वेने आपल्या पत्रात म्हटलंय. कोरोना व्हायरच्या पार्वभूमीवर जवळपास सात महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणाऱी लोकल सेवा अत्य़ावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी टप्प्याटप्प्यानं सुरु करण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र अद्यापही ही रेल्वे सेवा सुरु करण्यास विलंब होत आहे. पण, आता मात्र त्यासाठी वेगानं हालचाली होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारच्या प्रस्तावाल मध्य व पश्चिम रेल्वेने उत्तर दिले असून गर्दीच्या विभाजनासाठी तंत्रज्ञानातून उपाय शोधण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेने म्हटले आहे की, कोरोनाच्या आधी प्रत्येक दिवसाला ३५ लाख प्रवासी हे पश्चिम रेल्वेवर प्रवास करायचे, मात्र आता एका लोकलमध्ये सातशे प्रवाशी यानुसार दिवसाला ९.६ लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
यामुळे सर्वांसाठी लोकल सुरू करायचे असल्यास आधी तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी एखादा उपाय शोधावा, ज्याप्रमाणे पश्चिम बंगाल राज्यसरकारने शोधला आहे त्याप्रमाणे, महाराष्ट्र सरकार देखील विचार करत आहे, असे आधी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले होते. या तांत्रिक रुपयासाठी जी मदत लागेल ती करण्यास रेल्वे तयार आहे, असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.
तसेच सरकारने प्रत्येक तासाला एक लेडीज स्पेशल चालवण्याचे प्रस्तावात नमूद केले होते. मात्र आधीपासून सर्व लेडीज स्पेशल लोकल सुरू असून प्रत्येक लोकलमध्ये २३ टक्के जागा या लेडीज प्रवाशांसाठी राखीव आहेत. त्यामुळे प्रत्येक तासाला लेडीज स्पेशल चालवल्यास स्टेशनवर महिला प्रवासी वाट बघत उभे राहतील तसेच पुरुष प्रवाशांसाठी लोकलच्या फेऱ्या कमी होतील. यामुळे स्थानकावर गर्दी वाढेल, असे पश्चिम व मध्य रेल्वेने म्हटले आहे.
News English Summary: The Central and Western Railways have responded to the state government’s proposal and advised the state government to find a solution through technology to divide the crowd. The Western and Central Railways have said that before the Corona, 35 lakh passengers used to travel on the Western Railway every day, but now a locomotive will be able to carry 9.6 lakh passengers a day.
News English Title: Central and Western railway says first need to control rush News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो