22 November 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

लोकल प्रवाशांना आणखी दिलासा | मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय

Central railway, Suburban services, Mumbai Local Train, Marathi News ABP Maza

मुंबई, २४ सप्टेंबर: मध्य रेल्वेने अत्यावश्यक कर्मचाऱ्यासाठी धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढवल्यात. आजपासून मध्य रेल्वेवर ६८ अतिरिक्त लोकल धावणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरी लोकल फेऱ्यांची एकूण संख्या ४२३ इतकी झाली आहे. कोरोनाकाळात लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या आधी पश्चिम रेल्वेनेही लोकल फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.

मध्य रेल्वेने त्यांच्या विशेष लोकलच्या फेऱ्या ३५५ वरुन ४२३ फेऱ्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज २४ सप्टेंबरपासून ६८ अधिकच्या फेऱ्या मध्य रेल्वे चालवणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे रोज गर्दीतून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

या ६८ लोकलपैकी ४६ लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, खोपोली, कर्जत दरम्यान चालवण्यात येत आहेत तर अन्य २२ लोकल हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि गोरेगाव या दरम्यान चालवण्यात येतील, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मध्य रेल्वे मार्गावर आधी ३५५ विशेष लोकल दररोज धावत होत्या. ती संख्या आता ४२३ वर पोहचली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे व लोकलमध्ये गर्दी होऊ नये या हेतुने विशेष लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

 

News English Summary: In a bid to reduce overcrowding in locals trains amid the Covid-19 pandemic, the Central Railway has introduced 68 additional special suburban services in Mumbai from Thursday. Out of these 68 services, 46 will be on the main line (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus to Kasara, Khopoli and Karjat), and 22 on the harbour line (CSMT to Panvel and Goregaon), the Central Railway (CR) said in a release. With this, the total number of special services of CR in suburban Mumbai has gone up to 423 from 355 earlier.

News English Title: Central railway increases it is suburban services from today Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#railway(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x