एका दगडात दोन पक्षी | एकाच्या नियुक्तीने दोघांचं महत्व कमी होणार? - नाराजीचा सूर
मुंबई, १० ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या अगदी जवळचे मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नसल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे ११ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना सीएमओ कार्यालयात समन्वयकाचे पद देण्यात आले होते. तर महाविकास आघाडी सरकारसाठी आपल्या मंत्रीपदाची आहुती देणारे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांना केंद्रातील समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती. या दोन्ही पदांसाठी शासकीय लाभ, भत्ते देण्यात येत असल्याचा शासन निर्णयही काढण्यात आला होता. मात्र विरोधकांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उकरून काढला.
शिवसेनेतील आमदारांची कामे होत नसल्याची तक्रार वारंवार केली जात असल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री कार्यालय प्रमुख पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेच्या आमदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत खुद्द मुख्यमंत्र्यांनी रवींद्र वायकर यांच्याकडे समन्वयाची भूमिका देणार असल्याचे सुतोवाच केले.
त्यामुळे रवींद्र वायकर यांची पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं देखील समोर आलं आहे. आमदारांशी समन्वय ठेवण्यासाठी वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आपली कामं होत नसल्याची शिवसेना आमदारांची तक्रार असल्याने वायकर यांची नियुक्ती करण्याबाबत हालचाली सुरु आहेत.
आपले महत्व कमी होईल म्हणून गटनेते एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू मात्र यावर नाराज असल्याचं कळतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वायकर यांच्या नियुक्तीनंतर शिवसेनेच्या आमदारांचा एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याशी संपर्क कमी येईल म्हणून नाराजी असल्याची चर्चा आहे.
News English Summary: Movements are underway to re-appoint Ravindra Vaikar to the Chief Minister’s office. However, it has also come to light that Shiv Sena is dissatisfied with this. However, it is learned that group leader Eknath Shinde and the main speaker in the assembly Sunil Prabhu are upset over this.
News English Title: Chances of appoint MLA Ravindra Waikar to the Chief Minister office News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार