3 December 2024 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

RSS स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घालून काम केल्याने यश मिळतंय

Chandrakant Patil, RSS, Dharavi, Covid 19

मुंबई, १२ जुलै : धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत.

ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत त्याचे कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टीवर टीका करायची नाही का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी ‘धारावी’ कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण या धारावीने कोरोनावर मात केली आहे. पण याचं श्रेय सरकारचं नसून राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचं आहे असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी धारावीतील कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्र सरकारमुळे नाहीतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आल्याचं भाजपच्या नितेश राणे यांनी म्हटलं होतं.

आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटल होतं की, “आरएसएस आणि अन्य समाजसेवी संघटनांनी धारावीत दिवसरात्र मेहनतर करुन मदत केली, तिथल्या लोकांमध्ये जनजागृती केली. धारावी कोरोना रुग्ण घटण्याचं एकमेव कारण म्हणजे RSS आणि अन्य संस्था आहेत. महाराष्ट्र सरकारचं काहीही योगदान नाही. WHO ने उगाचचं याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देण्यापेक्षा खरं ज्यांनी मेहनत केली आहे, त्यांना दिलं असतं तर समाधान वाटलं असतं.”

 

News English Summary: In Dharavi, RSS volunteers risked their lives and went to every house for screening. There is no reason for the government to take all the credit. Chandrakant Patil has accused the government of corruption while fighting against Corona.

News English Title: Chandrakant Patil said government did nothing but the RSS volunteers who risked their lives at Dharavi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x