15 January 2025 3:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

पहिल्यांदा बघितले आहे की मुख्यमंत्रीच सांगत आहेत..आमच सरकार पाडा

Chief Minister Uddhav Thackeray, Public challenge, To opposition, Overthrow the government

मुंबई, २४ जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो शुक्रवारी संजय राऊत यांनी ट्विटवरुन शेअर केला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हानच दिले आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले आहे की, मी इथेच बसलोय. माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडून दाखवा. उद्धव यांच्या या वक्तव्यामुळे आता या संपूर्ण मुलाखतीविषयी राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून राहिली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली ही २५ (उद्या) व २६ (रविवार) जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला तीन चाकी सरकार म्हणत टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना दिसत आहेत. तसंच राष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना, “आत्ता तुम्हाला चीन नको आहे, पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का?,” असा सवाल विचारत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदावर बोलताना, “साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री असलो तरी याच’साठी’ केला होता अट्टहास असं नाही आहे..हा योगायोग आहे,” असं सांगितलं आहे.

मात्र मुख्यमंत्र्यांच्या सरकार पाडून दाखवा या विधानाची भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून खिल्ली उडवली आहे. नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, “पहिल्यांदा बघितले..मुख्यमंत्री सकट सगळे मंत्री सांगत आहेत..आमच सरकार पाडा!!….इतकी घाई कधीच बघितली नाही.”

 

News English Summary: Another promo of the interview given by Shiv Sena chief Uddhav Thackeray to ‘Saamana’ daily was shared by Sanjay Raut on Twitter on Friday. In this, Chief Minister Uddhav Thackeray has given a public challenge to the opposition to overthrow the government.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray has given a public challenge to the opposition to overthrow the government News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x