21 November 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

हिंगणघाट: आरोपीला कठोर शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही: मुख्यमंत्री

Hinganghat victim death, CM Uddhav Thackeray

दारोडा : माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. परिणामी दारोडा गावातील एका २४ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. काही वेळापूर्वी पीडितेचे पार्थिक तिच्या दारोडा गावात दाखल झालं आहे. आमच्या मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली आहे. आमच्या मुलीला जसा त्रास झाला त्या नराधमालाही तसाच त्रास व्हायला हवा, असं म्हणताना गावकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.

दरम्यान, हिंगणघाट येथील पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या तरुणीची प्राणज्योत मालवली. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थ केली, पण काळाने घाला घातला. मात्र या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणारन नाही, असं सांगतानाच आरोपीला शिक्षा व्हायलाच हवी म्हणून जलदगतीने प्रयत्न करण्याचे आणि सर्व यंत्रणा गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, ट्विट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

 

Web Title:  Chief Minister Uddhav Thackeray reaction after Hinganghat victim death.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x