5 November 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

विधानपरिषद | मुख्यमंत्री आज यादी राज्यपालांना सोपविणार | पण खडसेंबाबत...?

Chief Minister Uddhav Thackeray, 12 Legislative Council Candidates, Bhagat Singh Koshyari

मुंबई, २ नोव्हेंबर: विधानपरिषदेसाठी कोणत्या पक्षाकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आज विधानपरिषदेसाठी १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस ठाकरे सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याचं वृत्त आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अधिकृत यादी सुपूर्द करणार आहेत. त्यामुळे संबंधित यादीत कोणाची नावं असणार आहेत याची चिंता तीनही पक्षातील नेते मंडळींना आहे. विशेष म्हणजे त्यानंतर पुन्हा राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद निर्माण होणार नाही ना हे देखील पाहावं लागणार आहे.

दुसरी महत्वाची उत्सुकता म्हणजे या यादीत एकनाथ खडसे यांचं नाव असणार का याची चर्चा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगली आहे. सध्या तरी एकनाथ खडसे यांनी आपण कोणत्याही पदाची मागणी केल्याचं म्हटलं नसलं तरी एका अनुभवी नेत्याला राष्ट्रवादी नेमकी कोणती भूमिका देणार ते पाहावं लागणार आहे.

दुसरीकडे एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या शक्यतेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील कार्यरत झाल्या आहेत. त्यांनी स्वतः या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला तीव्र विरोध दर्शविल्याने पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष या संदर्भात नेमकी कोणती भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.

 

News English Summary: Everyone is curious as to which party, Congress, NCP and Shiv Sena will get a chance for the Legislative Council. It is reported that the recommendation of candidates for 12 seats for the Legislative Council will be handed over by the Thackeray government to Governor Bhagat Singh Koshyari today. Chief Minister Uddhav Thackeray himself will meet Governor Bhagat Singh Koshyari and hand over the official list. Therefore, the leaders of all the three parties are worried about whose names will be in the relevant list. It remains to be seen whether there will be a new dispute between the Governor and the Mahavikas Aghadi government.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray To Submit List Of 12 Legislative Council Candidates Bhagat Singh Koshyari News Updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x