18 November 2024 4:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

जिओ TV व गुगल मीट ऑनलाइन माध्यमांच्या पायलट प्रोजेक्टचे मुख्यमंत्र्यांना सादरीकरण

Chief Minister Uddhav Thackeray, Pilot projects demonstration, Geo TV, Google Meet

मुंबई, २२ जून : राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. आता त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

‘राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत’ असं उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाइन माध्यमांचे पायलट प्रोजेक्ट सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे सोमवारी त्यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो याचे प्रात्यक्षिक पाहिले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येत्या काही दिवसांत शिक्षक आमदार तसेच निवडक मुख्याध्यापक, शिक्षक यांनादेखील हे सादरीकरण करून त्यांच्याकडून सूचना मागवाव्यात असेही मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेतली. यावेळी शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असल्याने त्याची सर्व उपकरणांवर सुसंगतता असावी तसेच तो सहजरीत्या ऑफलाईन देखील उपलब्ध झाला पाहिजे हे पाहण्यास सांगितले. यावेळी त्यांनी गुगल मीटवरील एका ऑनलाइन वर्गाचेदेखील प्रात्यक्षिक पाहिले. विद्यार्थ्यांना कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ देता कामा नये तसेच त्या आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करणारी यंत्रणा हवी असेही ते म्हणाले. जिओ टीव्हीवर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्हीवर पहिली ते बारावी असे स्वतंत्र ५ वाहिन्यांचे सुधा नियोजन आहे असे सांगण्यात आले.

 

News English Summary: After the start of the school year, Chief Minister Uddhav Thackeray had directed to start pilot projects of various online media. On Monday, he saw a demonstration of how to fill an online classroom through Geo TV as well as Google Meet and interacted with the students.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray watched pilot projects demonstration of Geo TV as well as Google Meet News latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x