22 January 2025 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

VIDEO | एकटाच शिवसैनिक घुसला अन भाजप कार्यकर्त्यांना झोडलं | नितेश राणेंनी म्हटलं 'शिवप्रसाद'

MLA Nitesh Rane

मुंबई, २४ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्र पोहचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं.

एकटाच शिवसैनिक घुसला अन भाजप कार्यकर्त्यांना झोडलं, नितेश राणेंनी म्हटलं ‘शिवप्रसाद’ – Clashes between Shivsena and BJP workers at Juhu video shared by MLA Nitesh Rane :

या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला आहे.

नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणे समर्थक आणि युवासैनिक समोर आल्याने जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मुंबईत युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारी संबंधित एक व्हिडिओ भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शेअर केला आहे.

सदर व्हिडिओमध्ये काय दिसतंय?
रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असणाऱ्या शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते (खरं तर राणे समर्थक) यांच्या बाचाबाची होताना दिस्ततेय. त्यावेळी पोलीस दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मागे ढकलताना दिसत आहेत. त्यावेळी भाजप कार्यकर्ते झेंडे घेऊन असलेल्या ठिकाणी उजव्या बाजूने एक शिवसैनिक पोलिसांना चकवा देत थेट भाजपच्या कार्यकर्त्यांना चोप देताना दिसतो, त्यावेळी अचानक घुसलेल्या एका शिवसैनिकामुळे बिथरले भाजप कार्यकर्ते मागे हटतात आणि पोलीस संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन दोन्ही बाजूच्या घोळक्याला पांगवतात असं दिसतंय. मात्र याच व्हिडिओचा आ. आमदार नितेश राणे चुकीचा संदर्भ दिल्याचं पाहायला मिळतंय जणू भाजप कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना ‘शिवप्रसाद दिला’.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Clashes between Shivsena and BJP workers at Juhu video shared by MLA Nitesh Rane news updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x