22 January 2025 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

सचिन वाझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, API Sachin Vaze, Hasmukh Hiren

मुंबई, १० मार्च: मला कल्पना आहे, काही गैरसोय होतेय. पण सध्याचे दिवस असे आहेत, गर्दी करु नये. गर्दी होऊ नये म्हणून मी विनंती केली, ती माध्यमांनी मानली धन्यवाद, गैरसोयीबद्दल दिलगिरी असं प्रथम मुख्यमंत्री म्हणाले. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण झालं. हे अधिवेशन घेणे कोरोना काळात आव्हान होतं. मात्र ते घेतलं, सर्वांचे धन्यवाद असं मुख्यमंत्री म्हणाले.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी बोलत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवायला हवा, असं म्हटलं. “राज्यात सध्या एखाद्याला टार्गेट करण्याची नवी पद्धत सुरू झालीय. एखाद्या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याआधीच त्याच्यावर बेछुट आरोप करुन त्याला बदनाम करायचं हे योग्य नाही. मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर या दोन्ही प्रकरणांची सरकार अतिशय गंभीरपणे चौकशी करत आहे. तपास पूर्ण होऊ देत सारंकाही समोर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कोणत्याही गुन्ह्यात आधी फाशी आणि नंतर तपास असं होऊ शकत नाही. सचिन वझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय. हे चुकीचं आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अधिवेशन संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विविध प्रश्नांवर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली.

सर्वपक्षीय आमदार, विरोधी पक्ष यांनी उत्तम सहकार्य केलं. परवा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी म्हणालो होतो, या आव्हानात्मक स्थितीत कोणतंही रडगाणं न गाता अर्थसंकल्प दिलासा देणारा मांडला. महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर अधिवेशन संपलं. दहा दिवसात जे जे झालं, त्याचे आपण साक्षीदार आहे. विधीमंडळात जे काही चालतं ते आपण जनतेसमोर पोहोचवले असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

News English Summary: No crime can be hanged first and then investigated. Sachin Vaze is portrayed as Osama bin Laden. This is wrong, said Chief Minister Uddhav Thackeray. Today was the last day of the state budget session. After the convention, Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar held a press conference. At this time, the government clarified its position on various issues.

News English Title: CM Uddhav Thackeray clear his stand over police API Sachin Vaze issue news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x