15 November 2024 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

सचिन वाझे प्रकरण | ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकांचा धडाका | दोषींवर कारवाई होणार

CM Uddhav Thackeray, IPS officers, Home minister

मुंबई, १७ मार्च: मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंहच कायम राहणार आहेत. अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’ बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुप्त खलबते सुरु होती. या बैठकीत परमबीर सिंह यांची जागा कायम राहणार असल्याचं ठरलं, असं बोललं जातं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. वाझे यांचे तीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळले. एनआयए कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि अटक बेकायदेशीर असल्याचा त्यांचा दावा अमान्य केला आहे. केवळ वकिलांना भेटू देण्याची मागणी कोर्टाने अंशत: मान्य केली. चौकशीच्यावेळी वकिलांना सोबत राहण्याची मुभा देण्यात आली.

दुसरीकडे प्रसार माध्यमांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार NIA च्या चौकशीदरम्यान CCTV फुटेजमध्ये PPE किट परिधान केलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला वाझे यांनी PPE किट नष्ट केल्याचे पुरावे सापडले आहेत. सचिन वाझे यांनी किटच्या आतून जे कपडे घातलेले होते ते मर्सिडीज कारमधून जप्त केले आहेत.

 

News English Summary: Parambir Singh will continue as the Mumbai Police Commissioner. The ambush on Sachin Vaze, a suspended police officer by the National Investigation Agency (NIA) in the Ambani blast case, had been going on at the Varsha bungalow till late on Tuesday night. It is said that Parambir Singh’s seat will be retained in this meeting. Chief Minister Uddhav Thackeray, Director General of Police Hemant Nagarale, Mumbai Police Commissioner Parambir Singh and Home Minister Anil Deshmukh were present at the meeting.

News English Title: CM Uddhav Thackeray meet top Mumbai police IPS officers and Home minister news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x