मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेत विरोधकांना प्रतिउत्तर | हे होते महत्त्वाचे मुद्दे
मुंबई, ०३ मार्च: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. अत्यंत आक्रमक झालेल्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत थेट हिंदुत्व, बाबरी मशीद, शर्जील उस्मान, काश्मीर पंडीत, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यापासून ते युती तुटण्यापर्यंतच्या मुद्दयावरून भाजपला फैलावर घेतलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भाजपला थेट निर्लज्जच संबोधलं. मुख्यमंत्र्यांचं हे रौद्ररुप पाहून भाजप सदस्यही चिडीचूप होते.
पहिल्यांदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोपरखळ्या, नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक एक करुन प्रत्युत्तरं, कोव्हिडच्या काळातली सरकारची कामगिरी अशा मोठ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भाषण केलं.
उद्धव यांनी केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाल नसल्याचे सांगितले. मराठी काय भिकारी आहे का?, महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभे आहोत का?, असे प्रश्न उद्धव यांनी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केले. मी कोरोना काळातला सगळा हिशोब देतो. तुम्ही केंद्राकडून पीएम केअर्सचा हिशोब मागणार का, असा सवाल त्यांनी विरोधकांनी विचारला. तुम्हा माझ्याकडे हिशोब मागू शकता. पण पीएम केअर्सची माहिती आरटीआयमध्येही येत नाही आणि काही विचारलं तर तो देशद्रोह ठरतो. ही यांची लोकशाही, असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे;
- सुधीर मुनगंटीवारांच्या भाषणांनी चंद्रकांतदादांना आणि फडणवीसांना भिती वाटतीय.. आमचं कसं होणार, अशी त्यांच्या मनात भावना आहे. कला जिवंत असली पाहिजे… तिला मरु देऊ नका…
- विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास… मी आहे अथ्थेला, मी आहे हॅम्लेट…. असे चित्रपटातील संवाद म्हणत म्हणत मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली…
- वल्लभाई पटेल यांचं नाव हटवून नरेंद्र मोदींचं नाव त्या स्टेडियमला दिलं आहे. आता त्या स्टेडियमवर भारत प्रत्येक मॅच जिंकणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
- मराठी ही छत्रपत्रींती भाषा, अभिजात दर्जा द्या म्हणून आम्ही दिल्ली दरबारी जायचं का? मराठी भाषा काय भिकारी आहे का?, मुख्यमंत्री भडकले
- होय आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करणारच, पण तुम्ही सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत?, मुख्यमंत्र्यांचा बाजपला सवाल
- महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण लपवलेला नाही वा मृत्यूही नाही, विरोधकांच्या कोरोनावरच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
- बंद दाराआड देखील आम्ही कधी खोटेपणा केलेला नाही, खोटेपणा करणं आमच्या रक्तात नाही
- कोव्हिड काळात राज्याला मदत करण्याऐवजी दिल्लीला फंडाचं आवाहन केलं, आणि हिशेब आमच्याकडे मागताय?, दिल्लीच्या पीएम केअर फंडाचा हिशेब कोण देणार
- गॅसची हजारी आणि पेट्रोलची शंभरी, इंधन दरवाढीवरुन मुख्यमंत्र्यांचा टोला
- शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसले की पळे…. बांगलादेशी पाकिस्तानी सीमारेषा उघड्या.. शेतकरी आंदोलनाला छावणीचं रुप… शेतकरी काय अतिरेकी आहे काय?
- हमीभाव नाही तर हमखास भाव देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
- माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका, विदर्भ वेगळा होणार नाही किंबहुना होऊ देणार नाही
- शरजील उस्मानीला अटक केल्याशिवाय राहणार नाही
- कोव्हिड काळ असून देखील महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणलीय
- जिकडे आम्ही कमी पडलो, तिकडे जरुर सूचना करा पण महाराष्ट्राला बदनाम करु नका
News English Summary: On the issue of Hindutva, Chief Minister Uddhav Thackeray today launched a scathing attack on BJP. The Chief Minister, who became very aggressive, took the BJP directly to the assembly on issues ranging from awarding Bharat Ratna to Hindutva, Babri Masjid, Sharjeel Usman, Kashmir Pandit, Swatantryaveer Savarkar to breaking the alliance. What is special is that the Chief Minister directly called the BJP shameless. BJP members were also annoyed to see the Chief Minister’s face.
News English Title: CM Uddhav Thackeray today launched a scathing attack on BJP in state assembly news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS