23 February 2025 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कलर्सला खऱ्या मराठीची दहशत | राज ठाकरेंकडे मराठीत | मुख्यमंत्र्यांकडे इंग्रजीत माफीनामा

Colors TV channel, apologized, Marathi language, Jaan Kumar Sanu, Raj Thackeray

मुंबई, २९ ऑक्टोबर: जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याने कलर्स वाहीनीला माफीनामा लिहावा लागलाय. जान सानू यानं देखील बिग बॉससमोर स्वत: च्या कृत्याची माफी मागितली आहे. ही क्लीप वायरल झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत कलर्सने २४ तासात माफी न मागितल्यास प्रक्षेपण बंद पाडू असा इशारा दिला होता. त्यानंतर कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपला माफीनामा पाठवला पण या दोन्ही माफीनाम्यात भाषेचा फरक होता. मुख्यमंत्र्यांना पाठवलेला माफीनामा कलर्सने इंग्रजीत तर मनसेला पाठवलेला माफीनामा मराठी भाषेत लिहीला होता. यावरुन मनसेने राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,’ असं जान कुमार सानू म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्याचे पडसाद सगळीकडे उमटले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांना दिलेल्या इंग्रजी माफीनाम्यावरुन खोपकरांनी शिवसेनेला कोपरखळी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’ असं ट्वीट त्यांनी केलंय. खरं सरकार कुठे आहे हे कलर्सवाल्यांना पण माहिती असल्याचा टोला खोपकरांनी ट्वीटरच्या माध्यमातून लगावलाय.

दरम्यान, टीव्ही रियलिटी शो बिग बॉस १४ मध्ये आता हळूहळू वादविवाद वाढू लागले आहेत. पण अलीकडेच या शोचे स्पर्धक आणि गायक जान कुमार सानू याने मराठी भाषेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जान याच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यासाठी २४ तास दिले होते. त्यानंतर बिग बॉस या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली. जानने मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली.

यावेळी जान कुमार सानू म्हणाला की, मी नकळत एक चूक केली त्यामुळे मराठी माणसांच्या भावनाला धक्का लागला, मराठी माणसांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी यासाठी माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही असं त्याने सांगितले.

 

News English Summary: Jaan Kumar Sanu had to write an apology to Colors channel for uttering offensive words about Marathi language. Jan Sanu has also apologized to Bigg Boss for his actions. After the clip went viral, MNS took an aggressive stance and warned Colors to stop airing if it did not apologize within 24 hours. After that, Colors channel sent its apology to Chief Minister Uddhav Thackeray and MNS president Raj Thackeray, but there was a difference in language between the two apologies. The apology sent to the Chief Minister was written in English by Colors and the apology sent to MNS was written in Marathi. As a result, MNS has targeted the state government.

News English Title: Colors TV channel apologized in two different languages write English letter to CM Uddhav Thackeray and Marathi to Raj Thackeray News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x