24 January 2025 4:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

माजी खासदार मिलिंद देवरा यांची पावलं भाजपाच्या दिशेने?

#

मुंबई: काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्यूस्टन येथील हाउडी मोदी या कार्यक्रमामधील भाषणाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमातील मोदींचे भाषण भारताची बौद्धिक आणि सांस्कृतिक ताकद दाखविणारे आहे. मिलिंद देवरांनी केलेल्या या ट्विटमुळे देवरा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मिलिंद देवराच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर दिलं आहे. मोदींनी मिलिंद देवरांचे आभार मानत सांगितले की, दिवंगत मिलिंद देवरा यांनीही अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. या दोन्ही देशातील मजबूत संबंध पाहून ते आनंदी झाले असते असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

त्यामुळे राजकीय वर्तुळात या ट्वीटची चर्चा रंगू लागली आहे. ३७० कलम असो किंवा पंतप्रधान मोदींचे भाषण असो मिलिंद देवरा हे भाजपच्या समर्थनार्थ उतरताना दिसत आहेत. मिलिंद देवरा यांची पाऊले भाजपाच्या दिशेने असल्याचे हे संकेत आहेत का ? अशा चर्चांना उधाण आले आहे.

मुरली देवरा असते तर त्यांनाही भारत आणि अमेरिकेचे आजचे संबंध पाहून आनंद झाला असता असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. लोकसभेची निवडणूक हरल्यापासून मिलिंद देवरांनी अनेक वेळा भाजपला समर्थन भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मिलिंद देवरा काँग्रेस पक्षापासून अंतर ठेवून आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x