22 December 2024 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

स्वबळाची घोषणा करणाऱ्या मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद निवडणुकीआधीच चव्हाट्यावर

MLA Bhai Jagtap

मुंबई, १६ जून | मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. कारण मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. भाई जगतापांची कार्यपद्धतीवर बोट ठेवत, आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप झिशान सिद्दीकींनी केली आहे.

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी पत्र लिहून भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी,राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान, मुंबई काँग्रेस मार्फत जनतेला टूलकिट वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यातील एक कार्यक्रम वांद्रे येथील बीकेसी पोलीस स्थानकात घेण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेस मंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते पण, वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांना बोलवण्यात आले नाही. बीकेसी पोलीस स्थानक हे आमदार सिद्दिकी यांच्या मतदारसंघात येत तिथे काँग्रेसने कार्यक्रम घेऊन स्थानिक आमदाराला बोलवलं नाही हा प्रोटोकॉल तोडणे आहे आणि हे सार्वजनिकरित्या खजील करण्यासारखे आहे असं झिशान यांनी पत्रात म्हटलं आहे.

इतकंच नाही तर, काही महिन्यांपूर्वी मुंबई युवा काँग्रेसच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत झिशान सिद्दिकीला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही असंही भाई जगताप यांनी पक्षातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचा गंभीर आरोप झिशान सिद्यकि यांनी आपल्या पत्रात केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Congress MLA Zeeshan Siddique complaints against Mumbai congress president Bhai Jagtap writes letter to Sonia Gandhi news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x