22 January 2025 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज, बैठकीत चर्चा

Congress, Mahavikas Aghadi

मुंबई, ११ जून: ‘हे सरकार शिवसेनेचे सरकार’, असल्याची भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती. मात्र, आता तर काँग्रेसचे मंत्रीच नाराज असल्याचे समजते. याचसाठी आज काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या घरी बैठक बोलावली असून, सरकारमध्ये नेमकी कॉंग्रेसची भूमिका काय यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या राज्यात कोरोनाचे संकट आहे. मात्र, या संकटाच्या काळात काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणत्याच निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याची खंत सध्या काँग्रेसच्या मंत्र्यांना आहे. एवढेच नाही तर जितके महत्व सध्या या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आहे तितके महत्व काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळत नसल्याचे काहींनी खासगीत बोलताना सांगितले. त्यामुळेच काँग्रेसचे मंत्री आता आपली सरकारमध्ये नेमकी भूमीका काय आहे यावर बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे महाविकासआघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीतून काँग्रेसच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सरकारमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होत आहे.

महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री न मिळाल्याने देखील काँग्रेस नाराज होती. त्यानंतर विधान परिषदेत एक जागा कमी मिळाली तेव्हा ही काँग्रेस नाराज झाली. आता निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याने काँग्रेस पुन्हा नाराज असल्याची चर्चा आहे.

 

News English Summary: After former Chief Minister Prithviraj Chavan expressed the feeling that this is the government of Shiv Sena, there was talk that there is no albel in the Mahavikas Aghadi. However, now it is understood that only the Congress minister is upset. For this, a meeting of all the Congress ministers was convened at the residence of Dairy Development and Animal Husbandry Minister Sunil Kedar today

News English Title: Congress party unhappy for not involving in important decisions of government News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x