काँग्रेसच्या दाव्याने शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे: देवेंद्र फडणवीस
मुंबई: “२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, मात्र तेव्हा काँग्रसने प्रस्ताव फेटाळला होता,” असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला. तसंच राज्यातलं सध्याचं सरकार पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर तसंच इंदिरा गांधी-करीम लाला यांच्या भेटीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचा हा गौप्यस्फोट खबळब माजवणारा आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी बोलताना सांगितलं की, “अत्यंत आश्चर्यकारक आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने हे वक्तव्य केल्याने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. यामधून शिवसेनेचा खरा चेहरा उघड होतो आहे. विचारधारा, तत्वं, मूल्य अशा काहीच गोष्टी नाहीत का ? सत्ता हेच त्यांच्यासाठी सगळं आहे का ? एकदा शिवसेनेने खुलासा केला पाहिजे”.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत जबाबदार आणि मोजून मापून बोलणारी व्यक्ती आहेत. आपण काय बोलतो आहोत याचं त्यांना नीट भान असतं. उचलली जीभ लावली टाळ्याला हा प्रकार त्यांच्या बाबतीत होत नाही. ते जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करतात ते गंभीरपणेच घेतलं पाहिजे, असं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले आहेत.
शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विचारधारा परस्पर विरुद्ध असतानाही या दोन पक्षांची मैत्री कशी होऊ शकली, या प्रश्नावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर बोट ठेवले. पाच वर्षांपूर्वीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं अल्पमतातलं सरकार विराजमान झालं होतं. शिवसेना तेव्हा विरोधी बाकांवर बसली होती. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझ्याकडे आघाडीचा प्रस्ताव आला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या ३ पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करू व भारतीय जनता पक्षाला सत्तेतून दूर करू, असा हा प्रस्ताव होता. मात्र, हा प्रस्ताव मी लगेचच फेटाळून लावला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळपास ४० आमदारांना पक्ष बदलण्यासाठी धमक्या किंवा आमिषे दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष-सेनेतील वाद पाहता या परिस्थितीत आम्ही आमची भूमिका बदलण्याचे ठरविले आणि पर्यायी सरकारबाबत विचार सुरु केला. मी यात पुढाकार घेतला, त्यानंतर चर्चा सुरु झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी सांगितले.
Web Title: Congress Prithviraj Chavan statement over Shivsena has exposed Shivsena Party says Opposition Leader Devendra Fadanvis.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO