22 January 2025 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

महाराष्ट्र व मुंबई पोलीसांची बदनामी भाजपाला खुश करण्यासाठी | कंगनाचा कबूलनामा - काँग्रेस

Congress spokesperson, Sachin Sawant, attacks BJP, Kangana Ranaut

मुंबई, ४ जानेवारी: उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतील खार येथे नवीन कार्यालय खरेदी केलं आहे. अर्थात, या कार्यालयाच्या खरेदीचा राजकारणाशी किंवा शिवसेना प्रवेशाशी अजिबात संबंध नाही, असं खुद्द त्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु, त्यावरून कंगनानं काल त्यांना टोमणा मारला होता. ‘मी स्वत:च्या कष्टानं बांधलेलं घरही काँग्रेसनं तोडून टाकलं. भारतीय जनता पक्षाला खूष करून माझ्या मागे फक्त २५-३० कोर्टाचे खटले लागले. मी सुद्धा हुशारीनं काँग्रेसला खूष केलं असतं तर बरं झालं असतं. मी खरंच मूर्ख आहे,’ असं ट्वीट तिनं केलं होतं.

त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनीही कंगनाला उत्तर दिलं होतं. ‘वेळ आणि जागा तू सांग. माझ्या खरेदीच्या व्यवहाराची कागदपत्रे घेऊन तुला भेटायला येते. माझ्या व्यवहाराचा राजकारणाशी संबंध नाही हेही तुला दाखवेन, असं उर्मिला यांनी म्हटलं होतं.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका करताना कंगना राणावत हिनं केलेल्या एका ट्वीटवरून काँग्रेसनं भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ‘मुंबई पोलीस व महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा सूत्रधार भारतीय जनता पक्षच होता हे कंगनाच्या ट्वीटवरून सिद्ध झालं आहे,’ असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

भारतीय जनता पक्षाला खूष करण्यासाठी कंगनाला महाराष्ट्राची व मुंबई पोलिसांची बदनामी केली, असं तिनं म्हटलं आहे. हा एक प्रकारचा कबुलीजबाब आहे आणि महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा सूत्रधार भारतीय जनता पक्ष आहे हे यातून स्पष्ट झालंय,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे. ‘भारतीय जनता पक्षानं नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही. जाहीर निषेध!,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Kangana Ranaut has said that Kangana defamed Maharashtra and Mumbai police to please the Bharatiya Janata Party. This is a kind of confession and it is clear that the Bharatiya Janata Party is the mastermind behind the conspiracy to defame Maharashtra, ‘said Sachin Sawant. Even if the Bharatiya Janata Party apologies to the people of Maharashtra, it will not get rid of this sin. Public protest !, ‘he has also said.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant attacks BJP over Kangana Ranaut tweet news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x