28 April 2025 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 29 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या गतीने कमाई होईल; पीएसयू शेअरबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक मालामाल करणार, दिग्गज ब्रोकिंग फर्मने दिले संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा; मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

महिलांच्या लोकल प्रवासात रेल्वे आणि भाजपचाच आडमुठेपणा | काँग्रेसचं टीकास्त्र

Congress, spokesperson Sachin Sawant, Maharashtra BJP, Mumbai Local Train

मुंबई, २० ऑक्टोबर : मुंबईत सरसकट सर्व महिलांसाठी लोकल सुरु करण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. मात्र रेल्वे बोर्डाने त्यासाठीची संमती नाकारली. ज्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासाठी भाजपाला जबाबदार धरलं आहे. नवरात्र सुरु आहे.. अशात आपल्या राज्यातील माता भगिनींना लोकल ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार इच्छुक आहे. मात्र रेल्वे बोर्ड त्यासाठी टाळाटाळ करतं आहे. यामागे भाजपा नेत्यांचा दबाव आहे. भाजपा या घाणेरड्या राजकारणात नवरात्र सुरु आहे हा मुद्दाही दुर्लक्षित करते आहे असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, एमएमआर रिजनमधील महिलांना लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यासंदर्भात चार बैठका झाल्या. या बैठका सप्टेंबर महिन्यात, ९ ऑक्टोबर आणि १३ ऑक्टोबरला दोन अशा झाल्या. १३ ऑक्टोबरला सायंकाळी झालेल्या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, रेल्वे अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी २.५ तास चर्चा होऊन महिलांच्या लोकल प्रवासासंदर्भातील सर्व पैलूंचा विचार करुन १७ ऑक्टोबर ही तारीख ठरवण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने तसे जाहीर करताच शेवटच्या क्षणी १६ तारखेला रेल्वेने हात वर करत रेल्वे बोर्डाच्या परवानगीचे कारण पुढे केले. चार बैठका घेऊन निर्णय झाल्यानंतर रेल्वे व्यवस्थापनाला रेल्वे बोर्डाच्या परवानगीची गरज का भासावी? आधीच त्यांनी याविषयावर रेल्वे बोर्डाशी चर्चा का केली नाही?

दरम्यान आज राज्यसरकारने रेल्वे बोर्डाला पुन्हा एकदा पत्र लिहून महिलांना प्रवासाची मुभा देण्याची विनंती केली आहे. मात्र त्यावरही रेल्वे बोर्डाने काहीही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे महिलांना रेल्वे प्रवास नेमका कधी करता येणार हा प्रश्न कायम आहे.

 

News English Summary: The state government is keen to provide local train facilities to mothers and sisters in our state. But the Railway Board is avoiding it. This is due to pressure from BJP leaders. Sachin Sawant has also said that the BJP is ignoring the issue of Navratra in this dirty politics.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant criticized BJP over Mumbai Local Train issue News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या