21 November 2024 11:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

नेत्यांचं आवाहन झुगारून 'बेस्ट' योद्धे कामावर; बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी 'मुंबईकर फस्ट'

Mumbai, Best Bus, Strike, Shashank Rao, Corona Crisis

मुंबई, १८ मे: मुंबईत कोरोनाचा उद्रेक असतानाच बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सोमवार १८ मेपासून बेमुदत बंद पुकारला खरा. पण बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक ऐकली नाही आणि कामावर आले. संपात सहभागी न होण्याचं कामगारांनी ठरवलं आहे. संपापेक्षा या कामगारांनी आपल्या सेवेला महत्व दिल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतूक होतं आहे.

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या आवाहनाला न जुमानता बेस्ट कर्मचारी सेवेसाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांच्या या निर्णय म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकासाठी आदर्श आहे. सकाळी ८ वाजता १५०० पेक्षा अधिक बेस्ट ड्राइव्हर आणि कंडक्टर कामावर हजर झाले आहेत. या काळात बेस्ट हीच मुंबईची जीवनवाहिनी बनली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेने संकटकाळात आंदोलन पुकारणारे नेते तोंडावर आपटले आहेत.

बेस्ट यूनियनने कोरोनापासून सुरक्षततेसाठी काही मागण्या केल्या होत्या. आतापर्यंत बेस्टच्या १२० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५२ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. कामगारांनी स्वत:च्या व कुटुंबियांच्या हितापेक्षा देशहिताला प्राधान्य दिल्याचा अभिमान आहे. आता तरी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांनी बेस्ट कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी, असे कृती समितीने आवाहन केलं आहे.

बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी म्हटलं की, ‘बेस्ट अत्यावश्यक सेवा आहे. संपूर्ण स्थिती नियंत्रणात आहे. कोरोना दरम्यान आम्ही ज्या सुविधा देत आहोत ते देत राहू. बेस्ट मुंबईला आपली सेवा देत राहिल.’ अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट सुमारे ३२६० कामगार काम करत आहेत. दररोज ‘बेस्ट’च्या बस या आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे दुकानदार या सर्वांची मुंबईच्या आणि मुंबईच्या बाहेरून ने आण करत आहेत.

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षततेसाठी मुख्यमंत्री, मनपा आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापकांना पत्र लिहिलं होतं. पण मागण्या मान्य न झाल्याने सोमवारी काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राव यांची मागणी होती की, बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात यावं. बेस्टच्या प्रत्येक डेपोमध्ये मेडिकल अधिकाऱी असावा. कर्मचाऱ्यांना एक कोटीचा विमा देण्यात यावा.

 

News English Summary: While there was an outbreak of corona in Mumbai, the BEST Joint Workers Action Committee called an indefinite shutdown from Monday, May 18. But Best employees did not listen to the strike call and came to work. The workers have decided not to participate in the strike. These workers are appreciated from all levels for giving importance to their service rather than strike.

News English Title: Corona crisis Mumbai BEST Bus workers continue their work News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x