23 February 2025 8:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

अर्णब यांची चौकशी करणाऱ्या पोलिसाला कोरोनाची लागण; मग ते स्टुडिओत कसे? काँग्रेस

Arnab Goswami, FIR

मुंबई, १२ मे: वांद्रे येथे जमलेल्या परप्रांतीय मजुरांच्या गर्दीला धार्मिक रंग दिल्याप्रकरणी रिपब्लिकन भारत वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. रजा एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटीचे सचिव इरफान अबुबकर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला होता.

मागील महिन्यात वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मूळ गावी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी जमा झाली होती. २९ एप्रिलला अर्णब गोस्वामी यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान या गर्दीचा धार्मिक स्थळाशी संबंध जोडला. तसेच विशेष समुदायाचे नागरिकच गर्दी करतात, असा दावा केला होता. यातून या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

तत्पूर्वी, पालघर हत्याकांडासंदर्भातील चर्चेच्या कार्यक्रमात गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याची तक्रार काँग्रेसच्यावतीने देशभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आली. याप्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार गोस्वामी यांनी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून पोलिसांकडून दोन नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या.

त्याच नोटीशीला प्रतिसाद देत गोस्वामी यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार सकाळपासून सुमारे १२ तास त्यांच्याकडे चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. आता, न्यायालयात अर्नब गोस्वामी यांची बाजू मांडताना, ऍड. हरिश साळवे यांनी, अर्नबची चौकशी करणाऱ्यांपैकी एक पोलीस कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर, कर्नाटकच्या बंगळुरूमधील युवक काँग्रेसचे नेते स्रीवत्सा यांनी अर्नब गोस्वामीला क्वारंटाईन करण्याची मागणी केली आहे.

अर्नब गोस्वामीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली, त्यानुसार अर्णबची चौकशी करणारा एक पोलीस कोरोना पॉझिटीव्ह आहे. मग, अर्णब यांना आत्तापर्यंत क्वारंटाईन का करण्यात आलं नाही. अर्णब हे आत्ताही स्टुडिओत जाऊन आपला शो कसा काय घेऊ शकतात. अर्णब यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सर्वांनाच क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणीही स्रीवत्सा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे केली. स्रीवत्सा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या ट्विटमध्ये मेन्शन केले आहे. दरम्यान, गोस्वामी यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी प्रतिककुमार शामसुंदर मिश्रा आणि अरुण बोराडे यांना अटक करण्यात आली होती.

 

News English Summary: During the discussion program on the Palghar massacre, Goswami said that it would create a religious rift and made offensive remarks against Congress President Sonia Gandhi. A case was registered against Arnab Goswami at Nagpur police station.

News English Title: Corona Quarantine Arnab Goswami the police positive who is interrogating journalist Goswami MMG News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x