23 February 2025 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

SRA'च्या प्रत्येक प्रकल्पात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार - जितेंद्र आव्हाड

Corona Virus, Minister Jitendra Awhad

मुंबई, १२ जून : यापुढे एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आव्हाड यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. सध्या राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या स्थितीमुळे आरोग्य विभागाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा शिरकाव मागील दिड महिन्यात झोपडपट्टी भागात झाला आहे. मुंबईतील धारावी असो किंवा ठाण्यातील झोपडपटटीचा भाग किंवा इतर महापालिकांच्या ठिकाणाच झोपडपटटी भाग या सर्वच ठिकाणी कोरोनाचा प्रभाव दिवसागिणक वाढत आहे. त्यामुळे त्यांना लागलीच उपचार मिळण्यासाठी देखील कठीण होत आहे. तसेच त्यांना क्वॉरान्टाइन करणो, त्यांच्या संपर्कातील रुग्णांचा शोध घेणो यासाठी तारेवरची कसरत सुरु आहे. एवढे करुनही कोरोनाचा प्रभाव झोपडपटटी भागातून कमी झालेला नाही.

त्यामुळे आता यापुढे ज्या ज्या भागांमध्ये एसआरए अंतर्गत झोपडपटटींचा विकास होईल त्या ठिकाणी प्रत्येक एसआरए स्कीममध्ये 1 हजार ते पाच हजार स्केअर फुटांचे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. विशेष म्हणजे हे आरोग्य केंद्र उभारतांना फ्री ऑफ एफएसआय बेसीसवर बांधण्याचा निर्णयही एसआरएने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्या आशयाचे आदेशही पारीत करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: A primary health center will be set up in each SRA project to take care of the health of slum dwellers. State Housing Minister Jitendra Awhad has taken this important decision. Awhad informed about this on Twitter.

News English Title: Corona virus Minister Jitendra Awhad announces set health centers every SRA project News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x