17 April 2025 12:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

धारावी पॅटर्न - पोलीस, आरोग्य यंत्रणा, सफाई कामगार, सरकार आणि महापालिका टीमवर्क

Coronavirus, Dharavi, covid 19

मुंबई, १३ जुलै : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या मुंबईतील धारावी परिसरात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला. कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग झोपडपट्टी भागात नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो, असा धोका वर्तवण्यात येत होता. मात्र प्रशासनावर युद्धपातळीने केलेल्या उपाययोजनांमुळे धारावीत कोरोनाला रोखण्यात यश आलं. या कामगिरीचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं.

धारावीत सोमवारी कोरोनाचे केवळ सहा नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे धारावीतील एक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता १०० पेक्षा कमी झाली आहे. धारावीत आतापर्यंत २३८१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सध्याच्या घडीला धारावीत केवळ ९६ एक्टिव्ह रुग्णच आहेत. तर धारावीला लागून असलेल्या माहीम आणि दादरमध्ये अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे. दादरमध्ये सोमवारी १९ तर माहीममध्ये कोरोनाचे १३ नवे रुग्ण आढळून आले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एक नवा ‘धारावी पॅटर्न’ समोर आला आहे. कोरोना नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेसोबत आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, या भागातील खासदार, आमदार, राज्य प्रशासन, महानगरपालिका, धारावीच्या आमदार व मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच अन्य लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. म्हणून हे यश दृष्टिक्षेपात आले.

या मोहिमेत पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील मौलिक कामगिरी केली, त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. कोरोना मुक्तीसाठी धारावी परिसरात झालेले शासन, प्रशासन आणि जनता यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यामुळे कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या याची जागतिक आरोग्य संघटनेने देखील दखल घेतली आहे, ही बाब निश्चितच मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी आहे. या कामी अगदी सुरुवातीपासून पोलीस यंत्रणेने विविध माध्यमातून धारावीतील नागरिकांना जागृत केले, असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचाही मोठा वाटा या यशात आहे, असे श्री.देशमुख यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: In the Dharavi area of Mumbai, which is known as the largest slum in Asia, the corona spread rapidly in the early days. Outbreaks appear to be exacerbated during this time.

News English Title: Coronavirus after Dharavi covid 19 another good news from Mumbai News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या