5 November 2024 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी? अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करा - राज ठाकरे

Coronavirus, Lockdown, Raj Thackeray, Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई, २६ मे: कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मे महिना संपत आला तरी राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय होत नाहीये आणि यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे मला विद्यापीठांचे कुलपती नात्याने तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘राज्यात कोरोनाची परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे या भागात किती दिवस लॉकडाऊन राहिल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कुणासाठी?’, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर ‘या रोगाचा प्रादुर्भाव किती जबरदस्त आहे हे तुम्हीदेखील जाणता असं मी मानतो. मग इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे आरोग्य धोक्यात घालण्यामागे नक्की प्रयोजन काय? दोन महिन्याचा लॉकडाऊन देशाने सहन केला. जीव वाचला तर पुढे सगळं शक्य आहे. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हरकत काय आहे?’, असा सवालही राज ठाकरे यांनी राज्यपालांना केला आहे.

तसेच ‘परीक्षा रद्द करणे म्हणजे विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे असं होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या किंवा महाविद्यालयात घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणाच्या आधारे निकाल लावता येईल. मला खात्री आहे की, शिक्षणतज्ज्ञांनी या विषयी मार्गदर्शन केले असेल. जर तसे नसेल तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना या विषयी नक्की मार्गदर्शन करेल’, असेही राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

 

News English Summary: Raj Thackeray has said that even though the month of May is coming to an end, the final year examinations of various universities in the state are not being decided and as a result, the future of millions of students is in the dark.

News English Title: Coronavirus Lockdown Mns Raj Thackeray Letter To Governor Bhagat Singh Koshyari Over Exams News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x