22 January 2025 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

महापौरांच्या मुलाला व जावयाला कोविड सेंटर कॉन्ट्रॅक्ट | भाजप अधिवेशनात पर्दाफाश करणार

CoronaVirus, Sanitizer scam, BJP MLA Ashish Shelar, Marathi News, Marathi News ABP Maza

मुंबई, ३ सप्टेंबर : अभिनेता दिनो मोर्या यांचे आणि शिवसेनेच्या एका नेत्याचे संबंध जगजाहीर आहेत. मोर्याशी संबंधित लोकांनाच आरोग्यविषयक कामांचे ठेके दिले जात आहेत. दुसरीकडे मुंबईच्या महापौर स्वत:च्या मुलाला आणि जावयाला कोव्हीड सेंटर देण्यात व्यस्त आहेत, या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश अधिवेशनात भाजपच्या वतीने केला जाईल, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते माजी शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार केला आहे. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

राज्यात १४२ कंपन्या सॅनिटायझर बनवत होत्या. यात पैसा आहे हे लक्षात येताच कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर ११० नवीन कंपन्यांचा जन्म झाला. त्यातील १६ कंपन्यांवर एफडीएने कारवाई करून छापे टाकले होते. त्यातल्या ८ कंपन्या बोगस निघाल्या. एफडीएला आपण पत्र लिहिल्यानंतर सुध्दा एकाही कंपनीची चौकशी केली गेली नाही. सरकारने २५२ कंपन्यांची चौकशी करायला हवी होती अशी खळबळजनक माहिती देताना मुंबई महापालिकेत सॅनिटायझर घोटाळ्यात एका परिवाराचा हात असल्याचा आरोपही शेलार यांनी केला.

एका एनजीओने सगळ्या सॅनिटायजरचे नमुने घेतले. त्यांच्या चाचणीमध्ये ४८ उत्पादने दोषी आढळली. मुंबई महापालिकेने श्वेतपत्रिका काढून ही सगळी माहिती जाहीर करावी. आम्ही या प्रकरणाची पोलिस आणि सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अधिवेशनात करणार आहोत असेही शेलार म्हणाले.

तत्पूर्वी, भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी महापौरांवर गंभीर आरोप केले आहेत. वरळीच्या त्याच पत्त्यावर ८ आणखी संदिग्ध कंपन्यांनी नोंदणी केली जिथे महापौर आणि सन्स किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (किश म्हणजे किशोरी) नोंदणीकृत आहे, ज्यांना बीएमसी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिवाय त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे देखील तक्रार दाखल केली आहे.

 

News English Summary: Mumbai mayor is busy giving covid center to his son and Javaya, all these issues will be exposed on behalf of BJP in the convention, said BJP leader and former school education minister Adv. Ashish Shelar has done. He has made these serious allegations in an interview given to a Marathi newspaper.

News English Title: CoronaVirus one family involved in sanitizer scam alleges BJP MLA Ashish Shelar Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x