22 April 2025 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRFC Share Price | 433 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON
x

जेएनयू हल्ला: होय देश संकटात आहे; सुनील गावसकर यांची प्रतिक्रिया

JNU Attack, Cricketer Sunil Gavaskar

नवी दिल्लीः जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचारावर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. देश संकटात आहे, असे गावसकर यांनी म्हटले आहे. लाल बहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.

शनिवारी लाल बहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी बोलताना, “देश संकटात आहे. देशातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी शिक्षण घेणे, अभ्यासात रमणे महत्त्वाचे आहे. आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात काही विद्यार्थी जखमी झाले. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यात याच विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. आपण एकजूट असू, तरच आपण पुढे जाऊ शकू. खेळाने आम्हाला हेच शिकवले की, एकत्र प्रयत्न केल्यावर आपण जिंकतोच. एकूणच बहुसंख्याक वर्ग अजूनही वर्गात करिअर घडवण्यामध्ये आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपण एकजुटीने पुढे जाऊ शकतो. खेळ आपल्याला हेच शिकवतात. जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा जिंकतो.”

सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून देशभरात आंदोलने होत आहेत. यावेळी अनेक विद्यार्थी आणि तरुणही आंदोलने करताना दिसत आहेत. यावेळी झालेल्या हिंसाचारात काही विद्यार्थी जखमी झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही बुरखेधारी गुंडांनी विद्यार्थांना बेदम मारहाण केली होती, या पार्श्वभूमीवर सुनील गावस्कर यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण आहे.

 

Web Title:  Country is in turmoil Cricketer Sunil Gavaskar expressed his concern over JNU Attack.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या