मुख्यमंत्र्यांच्या धाडसामुळेच ८६२ कोरोना मृत्यूंची नोंद - मुंबई पालिका आयुक्त
मुंबई, १८ जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील मुंबईकरांप्रती असलेला प्रामाणिकपणा आणि धाडस यामुळेच मला चार दिवसात नोंद नसलेल्या ८६२ कोरोना मृत्यूंचे विश्लेषण करता आले अशी कबुली मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. एका खासगी रु्ग्णालयात एकाच दिवशी १६ मृत्यू झाल्याची माहिती मला आकडेवारीवरून दिसली. ६ जूनच्या त्या आकडेवारीमध्ये काहीतरी गडबड असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर सहआयुक्त आशुतोष सलिल आणि अतिरिक्त् आयुक्त सुरेश काकाणी यांच्या सोबत माहिती घेतली असता त्या खासगी रु्ग्णालयात ६ जून रोजी एकच मृत्यू झाला होता. मात्र दाखवण्यात आलेले मृत्यू अगोदरच्या काळातील होते हे मला दोघांकडून समजले.
मुंबईत आजच्या दिवशी कोरोनाचे सुमारे ६० हजार रुग्ण असले तरी यातील प्रत्यक्षात रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची गरज असलेल्यांची संख्या कमी आहे. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास पालिकेकडे आजच्या दिवशी सर्व रुग्णालयात मिळून ११,५४८ खाटा उपलब्ध आहेत तर ९५४५ रुग्ण दाखल आहेत. तर सुमारे १५०० खाटा मोकळ्या आहेत. अतिदक्षता विभागात खाटा मिळत नाही अशी तक्रार होती परंतु आजच्या दिवशी आमच्याकडे आयसीयूच्या ११६३ खाटा असून त्यापैकी २१ खाटा रिकाम्या आहेत. ऑक्सिजन ची व्यवस्था असलेल्या ५६१२ खाटा असून आजच्या दिवशी यातील ४३१५ खाटांवर रुग्ण दाखल असून १२९७ खाटा रिकाम्या आहेत.
डेथ ऑडीट कमिटीपुढे मुंबईतील कोरोना मृत्यूची माहिती वेळेत न आल्याची अनेक कारणे असतील. कोरोनाच्या काळात डॉक्टर व वैद्यकिय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली, क्वारंनटाईन व्हावे लागले. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा ताण पडला असल्ायची शक्यता आहे. माझ्यापुढे जे आले ती माहिती आम्ही सार्वजनिक केली आहे. एखाद्या महामारीचा उद्रेक होणे अशी घटना शतकातून एकदाच होत असते. ही फार मोठी घटना असते. यामुळे या महामारीला कसे तोंड द्यावे याबद्द्ल आपण सगळे जण अन्नभिन्न असतो. मुंबईतील व राज्यातील इतर महापालिकेत कोरोना मृत्यू नोंदणीचा प्रकार घडला तसाच प्रकार इतर राज्यांमध्येही घडला असल्याची शक्यता आहे असेही ते म्हणाले.
News English Summary: “It was due to the sincerity and courage of Chief Minister Uddhav Thackeray towards Mumbaikars that I was able to analyze 862 unreported corona deaths in four days,” confessed Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal to the media.
News English Title: Courage of CM Uddhav Thackeray towards Mumbaikars that I was able to analyze 862 unreported corona deaths says BMC Commissioner Iqbal Singh Chahal News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो