19 April 2025 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

गणपती विसर्जनावेळी गर्दीत म्यावम्याव करणाऱ्यांना दादर शिवसैनिकांनी शांततेत घेतलं | रात्री उशिरा शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना शाखेतच चोपला

Dadar Shivsena

Dadar Shivsena | प्रभादेवीत शिंदे गट-शिवसैनिकांमध्ये पुन्हा राडा झाला आहे. काल रात्री शिंदे गटातील शाखा प्रमुखांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यानंतर शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. विसर्जनावेळी दोन्ही गट आले आमने-सामने असताना आमदार सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला असला तरी गोळीबाराचा आरोप सरवणकरांनी फेटाळला आहे.

या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर दादर येथील ५ शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, हे वृत्त पसरताच येथे शिवससैनिकांनी प्रचंड गर्दी केल्याने तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय.

शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी ठाकरे गटावर मारहाणीचा आरोप केला आहे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचं म्हटलं आहे . दादर शिवसेनेचे गटातील महेश सावंत यांच्यावर हा आरोप करण्यात येतोय. शिवाय शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांवर दादर पोलिस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा आमदार सुनिल शिंदे यांनी आरोप केलाय. दरम्यान 5 शिवसैनिकांना अटक करण्यात आलीये. शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांच्या फेसबुक पोस्ट नंतर हा वाद समोर आलाय.

समाधान सरवणकर – गर्दीत डायलॉगबाजी :
शिंदे गट फुटला तेव्हा सदा सरवणकर सुद्धा यांनी गुपचूप आसाम गाठलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दादर मध्ये बाईक रॅली काढताच आमदार सदा सरवणकर यांचे नगरसेवक पुत्र समाधान सरवणकर हे लपून बसले होते. मात्र गणपती विसर्जनावेळी मात्र गर्दीत डायलॉगबाजी करताना दिसले होते. त्यात त्यांनी माईकवर थेट म्याव-म्याव करत जाहीर बालिशपणा दाखवला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी सगळं शांतीत घेतलं, पण रात्री उशिरा शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना शाखेत घुसून चोप दिला. तशी तक्रार स्वतः शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Dadar Shivsena Vs MLA Sada Sarvankar check details 11 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dadar Shivsena(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या