15 January 2025 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

भाजपाला पक्षनिधी देणाऱ्या कंपनीचे दहशतवाद्यांशी आणि मुंबई बॉम्बस्फोट कनेक्शन फडणवीसांना ठाऊक आहे? - द-वायर वृत्त

Dawood Ibrahim, Terrorist, BJP Funding

मुंबई, 09 नोव्हेंबर | आता दाऊदच्या इशाऱ्यावर राज्य चालवायचं का? असा सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा जानेवारी २०२० मध्ये उपस्थित केला होता. कारण ठरलं होतं, संजय राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डबाबत विधान केलं होतं. यामध्ये इंदिरा गांधी करीमलाला याला भेटायला मुंबईत येत होत्या, याचसोबत मंत्रालयात अंडरवर्ल्डचे गुंड येत जात असायचे, असं देखील संजय राऊत म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला फैलावर घेत काही गंभीर सवाल उपस्थित केले होते. तसेच काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? काँग्रेसने संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं असं देखील फडणवीस म्हणाले होते.

त्यानंतर आता नवाब मलिक यांना सेंट्रल एजन्सीच्या ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी फडणवीसांनी दाऊद इब्राहिम आणि मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणाशी संबंध जोडत एक नियोजित ट्रॅप रचल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. हा सर्व खटाटोप केवळ ड्रग प्रकरणातून अडचणीत आलेल्या एनसीबी अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी केला आहे असं म्हटलं जातंय.

फडणवीस यांनी नवाब मलिक सवाल आणि त्यात किती तथ्य आहे असं म्हटलं तरी भाजपला मिळणाऱ्या पक्षनिधी बद्दल अधिकृत माहिती यापूर्वीच बाहेर आली आहे ज्याबद्दल फडणवीस अंधारात असावे. वास्तविक आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सकडून भारतीय जनता पक्षाला मोठी रक्कम दान म्हणजे पार्टी फंड म्हणून मिळाली होती. धक्कादायक म्हणजे इक्बाल मिर्ची या अंडरवल्ड’मधील कुप्रसिद्ध व्यक्तीबरोबर व्यावसायिक संबंध असल्याच्या संशयावरून हीच कंपनी ईडी’च्या चौकशी फेऱ्यात असल्याचं वृत्त ‘द-वायर’ने प्रसिद्ध केलं होतं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबध असणारा इक्बाल मिर्ची उर्फ ​​इक्बाल मेमन हा १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहे.

‘द वायर’च्या वृत्तानुसार, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेडने २०१४-१५ या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला १० कोटी रुपयांचा पार्टी फंड अर्थात पक्षनिधी दिल्याचं देखील म्हटलं आहे. विशेष म्हणजे स्वतः भारतीय जनता पक्षाने भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीमध्ये ही बाब समोर आली होती. तसेच त्याच कार्यकाळात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक आर्थिक मदत (पार्टी फंड) याच विवादित RKW बिल्डर्स’ने दिली आहे. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरीची कारवाई सुरु केलेल्या DHFL या कंपनीसोबत देखील RKW बिल्डर्स’चे जवळचे संबंध असल्याचं म्हटलं होते.

ईडीने RKW बिल्डर्स’चे माजी संचालक रणजीत बिंद्रा यांना इक्बाल मिर्ची आणि इतर कंपन्यांदरम्यान व्यवहारांदरम्यान मध्यस्ती केल्याच्या आरोपावरून अटक देखील केलं आहे. त्यानंतर ‘सनब्लिंक रिअल इस्टेट’ नावाच्या कंपनीने देखील भारतीय जनता पक्षाला २ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे ‘द-वायर’ने म्हटले होतं. विशेष म्हणजे या कंपनीवर देखील इक्बाल मिर्ची’कडून प्रॉपर्टी खरेदी केल्याच्या आरोपामुळे ईडीच्या रडारवर आहे.

त्यानंतर स्किल रियाल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी ज्याचे संचालक मेहुल अनिल बाविशी यांचे सनब्लिंकशीही घनिष्ट संबंध असल्याचं समोर आलं होतं. याच स्किल रियाल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड भाजपाला २ कोटी पार्टी फंड दिल्याचं निवडणूक आयोगाला दिल्या गेलेल्या माहितीत म्हटलं होतं. त्यानंतर दर्शन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने भाजपाला २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण ७ कोटी ५० लक्ष पार्टी फंड दिल्याचं म्हटलं होतं आणि याच कंपनीचे संचालक प्लॅसिड जेकब नॉरोन्हा यांचे RKW बिल्डर्स’सोबत घनिष्ट संबंध असल्याचं म्हटलं होतं.

महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी ईडीने इक्बाल मिर्ची प्रकरणात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली होती. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी सर्व आरोप फेटाळले होते आणि आपण कोणताही गैरव्यवहार केलं नसल्याचं म्हटलं होतं. तसेच याच प्रकरणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत उल्लेख देखील केला होता. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यामागे ससेमिरा लागल्याचं म्हटलं जाऊ लागलं. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अंडरवर्ल्ड’मधील लोकांसोबत व्यवसाय करणे हे देशद्रोहापेक्षा कमी नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजवाला यांनी ट्विटरवर भाजपाला चांगलेच कात्रीत पकडलं होतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Web Title:  The company had given election fund to BJP who had connection with terrorist and Dawood Ibrahim

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x