15 April 2025 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअर्सची जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस तज्ज्ञांकडून जाहीर - NSE: IRFC RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर तेजीमुळे फोकसमध्ये, 52 टक्के परतावा मिळेल, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: AWL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार उसळी, मजबूत खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

अयोध्येचा वाद मिटल्याचा आनंद, २-३ दिवसांत शिवनेरीवर जाणार: उद्धव ठाकरे

Shivsena, Ram Mandir, Uddhav Thackeray, Ayodhya

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या जमीन वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचं स्वागत करताना निकालाचा आनंद जरूर साजरा करा पण कुठेही काही वेडेवाकडे होईल असे वागू नका, असे आवाहन केले आहे. आपण येत्या २-३ दिवसांत शिवनेरीवर तर २४ नोव्हेंबर रोजी पुन्हा अयोध्येत जाणार असल्याचेही उद्धव यांनी जाहीर केले.

आज निकालानंतर सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आजच्या दिवशी शिवसेना प्रमुखांची आठवण येणे स्वाभाविक आहे. राम मंदिरासाठी लालकृष्ण अडवाणींचे मोठे योगदान आहे. लवकरच अडवाणींची भेट घेणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.

तसेच आजच्या निकालावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राम मंदिर उभं राहावं तसं रामराज्य यावं अशीही अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टाला धन्यवाद द्यावे तितके कमी आहे. लवकरात लवकर राम मंदिर उभं राहावं हीच इच्छा आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अतिशय आनंद झाला. जे कारसेवकांनी बलिदान दिलं त्यांना न्याय मिळणार का? हा इतकी वर्ष प्रश्न होता तो आज निकाली लागला, पण आज बाळासाहेब हवे होते असं त्यांनी आजच्या निकालावर मत व्यक्त केलं.

दुसरीकडे, हे प्रकरण अनेक दशकांपासून चालू होते आणि ते योग्य निष्कर्षावर पोहोचले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. जय-पराभवाच्या दृष्टीकोनातून या निकालाकडे पाहू नये, भूतकाळात जे घडलं ते विसरुया आणि पुन्हा एकत्र येऊ, समाजात शांतता अन् सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करुयात असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.

दरम्यान, अयोध्या प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने समाजाच्या सर्व वर्गांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने विचार केला ही खूपच चांगली गोष्ट असल्याचे पवार म्हणाले. अयोध्या प्रकरणी हा ऐतिहासिक निर्णय आला असून या निर्णयाचा सर्व वर्गातील लोकांनी सन्मान करायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी लोकांना केले. सु्प्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर लगेचच लोक वादग्रस्त जागी जाऊन पूजा करू लागले आहेत, या वर प्रतिक्रिया विचारली असता पवार म्हणाले की, कुणाला मंदिरात जायचे असेल त्यांनी जावे, कुणाला मशिदीत जायचे असेल त्यांनी जावे, तो त्यांचा अधिकार आहे. देशात शांततेसाठी समाजात बंधुभाव वाढण्यास मदत केली पाहिजे. असे पवार म्हणाले. हा विषय राजकारणापलिकडचा असल्याचेही ते म्हणाले.

अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामजन्मभूमी न्यासाकडे द्यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. दरम्यान मुस्लिम याचिकाकर्ते `इकबाल अन्सारी यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्याणाचं स्वागत करत, हिंदू-मुस्लिम समाजाला जातीय सलोखा राखण्याचं आवाहन केलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या