8 September 2024 8:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

VIDEO | आमचं सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता असं सांगणारे फडणवीस फसले, शिंदेंच्या त्या माहितीमुळे खोटं उघड

Devendra Fadnavis

DCM Devendra Fadnavis | वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात विषय गाजतोय. अनिल अग्रवाल यांनी सगळं ट्विट करून सांगितलं. पण ३ पत्रकार आहेत जे त्यांच्या संस्थेसाठी नाही तर राजकीय स्वार्थासाठी काम करतात. ज्या दिवशी मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यादिवशी मी CEO एमआयडीसीला बोलावलं आहे. त्यानंतर वेदांताची चौकशी केली. मला त्यांनी सांगितलं की गुजरातकडे वेदांताचा कल आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत गुजरातकडे आम्ही गेलो आहोत.

गुजरात महाराष्ट्राचा भाऊ :
गुजरात हा देखील देशातलेच एक राज्य असून महाराष्ट्राचा भाऊ असे संबोधले जाते. त्यामुळे हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही असेही फडणवीस म्हणाले आहेत. सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती. त्यामुळे आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.

आमचं सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय :
आपण चांगलं पॅकेज त्यांना ऑफर केलं होतं. मात्र शेवटी त्यांनी मला सांगितलं की आमचा हा निर्णय झाला आहे. मात्र पुढची सगळी गुंतवणूक यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करू. आमचं सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता. ज्यांनी काहीच केलं नाही ते आम्हाला आता शहाणपणा शिकवत आहेत. आम्ही प्रकल्प महाराष्ट्रात राहावा म्हणून आम्ही निकराचे प्रयत्न केले. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेऊन दाखवणार अशीही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या माहितीतून सत्य समोर आलं :
आमचं सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता असं सांगणारे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र धादांत खोटं बोलत असल्याचं सिद्ध होतंय. त्याला कारण आहे १७ ऑगस्टपासून पार पडलेलं राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. फडणवीस यांनी आज स्पष्टीकरण देताना म्हटलं की, आमचं सरकार (शिंदे फडणवीस) येण्यापूर्वीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता. आता प्रश्न हाच आहे की फॉक्सकॉनचा निर्णय झालाच होता तर त्याची माहिती शिंदे-फडणवीस सरकारला होती. जर गोष्टी शिंदे सरकार येण्यापूर्वीच फॉक्सकॉनच्या बाजूने झाल्या होत्या तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं सरकार ( शिंदे-फडणवीस) स्थापन झाल्यावर विधिमंडळात सभागृहाला आणि राज्यातील जनतेला याच वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्या प्रकल्पाबद्दल माहिती देताना म्हटले होते की, “अनेक उद्योगपती येत आहेत, ते वेदांतवाला आला होता, जवळपास ४ लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करत आहेत. असे लोक येत आहेत आपल्याकडे..उद्योगासाठी आपल्याला… काय आहे शेवटी इथे त्यांना त्रास होता कामा नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन रेकॉर्ड विधानसभेच्या अधिवेशनात म्हणाले होते. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन रेकॉड वेदांता महाराष्ट्रात जवळपास ४ लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करत आहेत असं म्हणाले ते खोटं होतं का? किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जे बाहेर म्हणाले ते खोटं आहे याच उत्तर जनतेला देणं गरजेचं आहे.

एकूण या अधिवेशनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीवरून आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही चुकीची माहिती देत आहेत किंवा दोघांमधील एकजण खोटं बोलत आहे असंच म्हणावं लागेल. पण साधारणपने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळात ऑन रेकॉर्ड अशी चुकीची किंवा खोटी माहिती देणार नाहीत हे मान्य करावे लागेल. त्यामुळे वेदांता महाराष्ट्रात जवळपास ४ लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी सरकार आल्यावर विधिमंडळात म्हटले होते, मग गुजरात विधानसभा निवडणुकीच्या २ महिने आधी आणि गुजरातमध्ये बेरोजगारी मुद्दा प्रमुख मुद्दा झाल्याने नेमकी कोणती सूत्र वेगाने हलली ते समजणं गरजेचं आहे. कारण दिल्लीतील रामलीला मैदानावरील राहुल गांधींच्या भाषणात जसा ‘क्रोनी कॅपिटॅलिस्ट’ अदाणींवर हल्ला झाला आणि त्यानंतर अदानी समूह ट्विट करून जसा स्पष्टीकरण देऊ लागला, तसाच प्रकार वेंदांताचें अग्रवाल देखील करू लागल्याने दुसरं काही अधिक सांगायला नको असं म्हणता येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: DCM Devendra Fadnavis information not matched with CM Eknath Shinde over Vedanta Project check details 16 September 2022.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x