22 January 2025 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

महाराष्ट्रासाठी लज्जास्पद | मराठी माध्यमातून शिक्षण म्हणून BMC'ने नोकरी नाकारली

Denied a job, BMC, Marathi language Education

मुंबई, १७ फेब्रुवारी: मराठी माणसाच्या मुद्द्यांवर स्थापन करण्यात आलेल्या शिवसेनेची ज्या राज्यात आणि महापालिकेत सत्ता आहे तिथे मराठी भाषेत शालेय शिक्षण झालं म्हणून नोकरी नाकारण्यात आलीये.मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये एकूण २५२ शिक्षकांची निवड करण्यात आली होती, मात्र आता मराठीत शिक्षण झाल्याचं कारण देत १०२ शिक्षकांना नियुक्ती नाकारण्यात आल्याचा आरोप केला जातोय. केवळ इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं नसल्याने तुम्हाला ही नोकरी देऊ शकत नाही, असं बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा आरोप त्यांनी केलाय. विशेष म्हणजे या डावलण्यात आलेल्या 102 शिक्षकांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झालं आहे.

महापालिकेच्या शाळांसाठी शिक्षकांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमांतून निवडलेल्या १०२ उमेदवारांना शेवटच्या क्षणी नोकरी नाकारण्यात आली. पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजीतूनच हवे, अशी अट असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल वाढल्यामुळे पालिकेने काही वर्षांपूर्वी अर्ध इंग्रजी आणि संपूर्ण इंग्रजी माध्यमाच्या (मुंबई पब्लिक स्कूल) शाळा सुरू केल्या. या शाळांसाठी शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १०२ उमेदवारांची महापालिकेच्या इंग्रजी शाळांसाठी निवड करण्यात आली. मात्र नंतर या उमेदवारांना त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीत झाले असल्यामुळे इंग्रजी शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक करता येणार नाही असे कळवण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे डावलण्यात आलेल्या या उमेदवारांचे पदवी आणि पदव्युत्तर बीएडपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झाले आहे.

पालिकेने भरतीबाबत काढलेल्या जाहिरातीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी इंग्रजीमधून शिकलेले शिक्षक हवे असल्याची अट होती. मात्र राज्य सरकारच्या ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून या शिक्षकांची दिशाभूल झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. आता या मुद्दय़ावरून आरोप- प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. या शिक्षकांनी पालिकेच्या एमपीएस शाळांऐवजी यूपीएस (अर्बन प्रायमरी स्कूल) शाळांसाठी अर्ज केला असता तर ते सर्व शिक्षक पात्र ठरले असते, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.

मराठी भाषक उमेदवारांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना ‘यूपीएस’ शाळांमध्ये सामावून घेता येऊ शकते का याची चाचपणी केली जाईल, असे महापौरांनी सांगितले होते. तसेच काही जण शिवसेनेला बदनाम करण्यासाठी वाद उकरून काढत आहेत त्यामुळे उमेदवारांचे नुकसान होईल, असेही महापौर पेडणेकर म्हणाल्या होत्या.

 

News English Summary: The Shiv Sena, which was formed on the issues of Marathi people, was denied a job in the state and municipal corporation where the schooling was done in Marathi language. . He alleged that BMC officials told him that he could not give you the job as he was not educated in English only. It is noteworthy that the undergraduate and postgraduate education of these 102 teachers has been done through English medium only.

News English Title: Denied a job in the state and municipal corporation where the schooling was done in Marathi language news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x