22 January 2025 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

पार्थ पवारांवर प्रतिक्रिया | उपमुख्यमंत्री अजित पवार तडकाफडकी शरद पवारांच्या भेटीला

Deputy CM Ajit Pawar, NCP President Sharad Pawar, Parth Pawar

मुंबई, १२ ऑगस्ट : पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परिणामी शरद पवार यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत” अशी प्रतिक्रिया देऊन पार्थ पवारांना राजकीय प्रवासात संपूर्ण आयुष्यभर ऐकावं लागेल असं वक्तव्य केलं असल्याचं म्हटलं आहे.

त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवारांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर अजित पवार पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे.

अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांना शरद पवारांनी फटकारल्यानंतर अजित पवार शरद पवारांना भेटायला गेले आहेत. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. यानंतर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला. नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर पार्थ पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला आहे. मला यावर काहीही बोलायचं नाही, असं पार्थ पवार म्हणाले आहेत.

 

News English Summary: State Deputy Chief Minister and NCP leader Ajit Pawar has visited Sharad Pawar. Ajit Pawar has reached the Silver Oak Bungalow, Sharad Pawar’s residence in Mumbai. Ajit Pawar is accompanied by Jayant Patil.

News English Title: Deputy CM Ajit Pawar at Silver Oak to meet NCP President Sharad Pawar News latest Updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x