5 November 2024 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

ते त्यांचे वैयक्तिक मत असावे | शिवसेनेने दिलेला त्रास आम्ही कधीही विसरणार नाही - संतोष धुरी

Bala Nandgaonkar, Aaditya Thackeray, Sushant Singh Rajput, MNS Santosh Dhuri

मुंबई, १४ ऑगस्ट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात पाठराखण केली. मात्र, समाज माध्यमांवर अविनाश जाधव यांना झालेल्या त्रासापासून ते अनेक प्रकरणांचा हवाला देत महाराष्ट्र सैनिक यावरून असहमती दाखवत आहेत. आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या राजकारणामुळे अनेकवेळा त्रास सहन करावा लागतो. मात्र शिवसेनेतून नेहमी आपल्या विरोधातच सुरु असतो, मग आपले नेते त्यांच्या पाठीशी का उभे राहतात तेच समजत नाही असं कार्यकर्ते समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देत आहेत.

त्यात आदित्य ठाकरे यांना केव्हा मनसेच्या समर्थनार्थ एखादी गोष्ट केल्याचं कार्यकर्त्यांना माहित नसल्याने त्यांच्या वेदना पुन्हा जाग्या होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष करून शिवसेनेच्या राजकरणामुळे ज्यांना जेलच्या वाऱ्या आणि तुरुंगवास भोगावा लागला आहे ते पदाधिकारी देखील यावरून नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षासाठी जीवाचं रान करणारे आणि तुरुंगवास भोगणारे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक म्हणजे संतोष धुरी हे पक्षात सर्वांना माहिती आहे. त्यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मनसे नेते संतोष धुरी यांनीही बाळा नांदगावकर यांच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याबाबतचे मत हे बाळा नांदगावकर यांचे वैयक्तिक मत असावे. आम्ही महाराष्ट्र सैनिक शिवसेनेने दिलेला त्रास आणि दररोजचा आमचा त्यांच्याशी होणार संघर्ष विसरणार नाही, असं मत धुरी यांनी व्यक्त केलं. यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रकरणावर काय अंतिम भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर मनसेचे नेते मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. “ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून अशाप्रकारची गोष्ट झाली असेल, असं वाटत नाही. भाजपच्या आरोपांमुळेच हा वाद सुरु झाला”, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावर यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आदित्य ठाकरे यांना मनसेचं समर्थन असल्याचं उघड झालं आहे.

 

News English Summary: MNS leader Santosh Dhuri has also expressed displeasure over the role of Bala Nandgaonkar. The opinion of Aditya Thackeray should be the personal opinion of Bala Nandgaonkar. We will not forget the trouble given by Maharashtra Sainik Shiv Sena and our daily struggle with them, said Dhuri.

News English Title: Disagreement with Bala Nandgaonkar on minister Aaditya Thackeray support News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BalaNandgaonkar(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x